निराधार महिलांना साडी-चोळीचे वाटप
By Admin | Updated: December 26, 2016 01:56 IST2016-12-26T01:56:43+5:302016-12-26T01:56:43+5:30
ईश्वर देशमुख फाऊंडेशनच्यावतीने रविवारी तालुक्यातील आश्रमशाळा येथे निराधार गरीब,

निराधार महिलांना साडी-चोळीचे वाटप
चिंचोली येथे स्तुत्य उपक्रम : उटणे लावून घातले अभ्यंगस्नान
दिग्रस : ईश्वर देशमुख फाऊंडेशनच्यावतीने रविवारी तालुक्यातील आश्रमशाळा येथे निराधार गरीब, असहाय्य महिलांचा साडी, चोळी देऊन सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आगळ््यावेगळ््या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.
समाजातील निराधार महिलांना चिंचोली येथे एकत्रित करण्यात आले. सर्व प्रथम १८ महिलांना उटणे लावून अभ्यंग स्रान घालण्यात आले. त्यानंतर त्यांना नवीन नववारी पातळ व चोळी बांगल्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ताट, रांगोळी घालून जेवण देण्यात आले. त्यांच्यातील विविध कलागुणांना उजाळा देण्यासाठी त्यांच्यामधील काहींनी ओव्या, स्त्रोत, उखाणे आदी सादर केले. तसेच स्वत:चा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी वैशाली देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी अनिता वानखेडे, रेखा पिदळकर, पुष्पा गावंडे, वर्षा सुपारे, सीमा निकम, निर्मला देशमुख, सुचिता देशमुख, अपेक्षा देशमुख, शुभांगी जगताप, राधिका जोशी, चेतना ढोले आदी महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)