जीवनदायी ‘१०८’ ची ४७ हजार रुग्णांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:17 IST2017-08-26T21:17:04+5:302017-08-26T21:17:28+5:30
जिल्ह्याचे विस्तीर्ण असे भौगोलिक क्षेत्रफळ असून तातडीच्या रुग्णसेवेसाठी प्रत्येक जण ‘१०८’ हा टोल फ्री क्रमांक डायल करून मदतीसाठी धावा करतो.

जीवनदायी ‘१०८’ ची ४७ हजार रुग्णांना संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचे विस्तीर्ण असे भौगोलिक क्षेत्रफळ असून तातडीच्या रुग्णसेवेसाठी प्रत्येक जण ‘१०८’ हा टोल फ्री क्रमांक डायल करून मदतीसाठी धावा करतो. त्याला प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांचा या रुग्णवाहिका सेवेवरचा विश्वास दृढ झाला आहे. जीवनदायी असलेल्या या रुग्णवाहिकेमुळे आतापर्यंत ४७ हजार ८३ अपघाग्रस्तांना ऐन वेळेत मदत मिळाली आहे. तालुका व जिल्हा मुख्यालयापासून दूर अतंरावर असलेल्या आडवळणावरच्या गावात सुसज्ज अशी रुग्णवाहिका तात्काळ पोहोचविण्यात भारत विकास ग्रृपला यश आले असून खºया अर्थाने जिल्हावासीयासाठी ही सेवा संजीवनीचे काम करत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १३ हजार ५४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील २७ लाख लोकसंख्येला सेवा देण्यासाठी जिल्ह्यात एकूण २३ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी पाच रुग्णवाहिकेत अत्याधुनिक उपचार सुविधा आहे. यामध्ये लघु शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी सर्व सुविधा उपलब्ध आहे. रुग्णवाहिकेसोबत प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरसुध्दा उपलब्ध राहतात.
रस्त्यावरचा अपघात, पूर, आग अशा आपदेतील जखमींसह हृदयविकाराचे रुग्ण, गर्भवती महिला यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था १०८ रुग्णवाहिकेतून केली जाते. आतापर्यंत सेवा दिलेल्या रुग्णामध्ये ३१ टक्के गर्भवती महिला आहेत. १२ टक्के हे अपघातातील जखमी तर ३८ टक्के गंभीर रुग्ण आहेत. ही रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असून एका फोन कॉलवर मदत मिळते. त्यामुुळे संकटसमयी प्रत्येक जण देवा प्रमाणेच १०८ चा धावा करतो.