संजय तुरक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:42 IST2021-03-26T04:42:08+5:302021-03-26T04:42:08+5:30

घाटंजी : तालुक्यातील चिंचोली (को) येथील प्रभारी मुख्याध्यापक संजय अजाबराव तुरक यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यवतमाळ ...

Sanjay Turk honored with Ideal Teacher Award | संजय तुरक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

संजय तुरक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

घाटंजी : तालुक्यातील चिंचोली (को) येथील प्रभारी मुख्याध्यापक संजय अजाबराव तुरक यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

यवतमाळ येथे जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, बांधकाम सभापती राम देवसरकर, स्वाती येंडे, मधुकर काठोळे, डाॅ. सतपाल सोवळे, पंचायत समिती सभापती नीता जाधव यांच्या उपस्थितीत त्यांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यापूर्वी त्यांना राष्ट्रीय ग्लोबल पुरस्कार, मानव विकास मंडळ (मुंबई) द्वारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शिक्षक पॅनलद्वारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे वर्षभर दप्तरमुक्त शाळा, अक्षरे निवडा-शब्द बनवा व त्यापासून वाक्य तयार करा, अंक निवडा, संख्या बनवा, लहान-मोठेपण ठरवा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार करा हे उपक्रम राष्ट्रीय स्तरावर गाजले. क्षेत्रभेट उपक्रमात अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी ६० शैक्षणिक उपक्रम राबविले. पुरस्काराबद्दल संजय तुरक यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Sanjay Turk honored with Ideal Teacher Award