शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राठोड उद्या पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार; यवतमाळात बैठकही घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 19:36 IST

sanjay rathod: पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे येत आहेत.

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे येत आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सहपरिवार दर्शन घेणे व त्यानंतर यवतमाळात कोरोनाची आढावा बैठक घेणे असा त्याचा मंगळवारचा अधिकृत कार्यक्रम आहे.

संजय राठोड हे सकाळी ९ वाजता यवतमाळातून शासकीय वाहनाने सहपरिवार पोहरादेवीकडे रवाना होणार आहेत. तेथे ११.३० वाजता पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर एक तास थांबणार आहेत. दुपारी १ वाजता तेथून दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे दर्शनासाठी येणार आहेत. तेथेही त्यांचा एक तासाचा वेळ राखीव राहणार आहे. त्यानंतर ते मोटारीने यवतमाळकडे रवाना होतील. पोहरादेवी येथे शिवसेनेचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार असल्याचेही समजते. त्यासाठीच सोमवारी यवतमाळातून किती कार्यकर्ते, किती वाहने न्यायची याबाबत नियोजन झाले. तर यवतमाळ येथे दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यात ते जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

दरम्यान, मंगळवारी ना. संजय राठोड हे पोहरादेवीला जाणार असल्याचे वृत्त कळल्याने सोमवारीच त्यांच्या बंगल्यापुढे पत्रकारांनी गर्दी केली होती. थेट नागपूर-मुंबईतील माध्यम प्रतिनिधींनी ना. राठोड यांच्या यवतमाळातील बंगल्यापुढे अख्खा दिवस घालवला.  मात्र ना. राठोड यांचा बाईट मिळणे तर दूरच; पालकमंत्र्यांची साधी झलकही कुणाला दिसली नाही.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण