शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

पोलिओ डोसऐवजी पाजले सॅनिटायझर, १२ बालके रुग्णालयात, यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 06:55 IST

Yavatmal News : पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी अनवधानाने बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी त्याच रंगाचे सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी येथे घडला.

यवतमाळ - पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी अनवधानाने बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी त्याच रंगाचे सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी येथे घडला. सॅनिटायझर पाजलेल्या १२ बालकांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बालकांना कसलाही त्रास नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.भांबेरा आरोग्य केंद्रांतर्गत कापसी अंगणवाडीत पोलिओ लसीकरण  कार्यक्रम सुरू असताना तेथे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व डॉक्टर गावंडे उपस्थित होते. मुलांना पोलिओ डोस देणे सुरू असल्याची पाहणी करण्यासाठी सरपंच युवराज मरापे तेथे पोहोचले. त्यांनी कुतूहलापोटी पोलिओ डोसची बाटली उचलून पाहिली, तेव्हा ते सॅनिटायझर असल्याचे आणि तेच मुलांना पाजले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ लसीकरण थांबविले. ज्या मुलांना डोस दिले गेले, त्यांना तत्काळ परत बोलावून घेण्यात आले. झालेल्या प्रकाराची माहिती पारवा पोलीस ठाण्यात देण्यात आली. सॅनिटायझर दिलेल्या १२ मुलांना सुरक्षितता म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या गंभीर प्रकाराची माहिती होताच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन बालकांची विचारपूस केली. 

डॉक्टरसह तिघांची सेवा समाप्तदरम्यान, या प्रकरणात तेथील वैद्यकीय अधिकारी (सीएचओ), आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका या तीन जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले. याशिवाय वरिष्ठ डॉक्टरांवरही निलंबनासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाण्याचे संकेत त्यांनी दिले.  भंडारा येथील दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठ डॉक्टरांना सोडता कामा नये, असे मत व्यक्त केले जात आहे.पोलिओऐवजी सॅनिटायझर दिलेल्या १२ मुलांना बालरोग विभागात दाखल केले आहे. यातील कुणालाच कुठला त्रास नाही. सर्व मुले ठणठणीत आहेत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.- डॉ. सुरेंद्र भुयार, अधीक्षक, शासकीय रुग्णालय, यवतमाळ

टॅग्स :YavatmalयवतमाळHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र