रेती तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला
By Admin | Updated: November 10, 2015 03:06 IST2015-11-10T03:06:02+5:302015-11-10T03:06:02+5:30
रेती तस्करांनी वन कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उमरखेड

रेती तस्करांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला
पार्डी बोरीची घटना : २० जणांवर गुन्हा
यवतमाळ : रेती तस्करांनी वन कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील पार्डी बोरी वन कक्षात रविवारी घडली. या प्रकरणी २० जणांंवर दराटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध उत्खनन होत असल्याची माहिती किनवटचे सहायक वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शिवराम भोराडे यांना मिळाली. पथकासह जाऊन या ट्रॅक्टरला पार्डी बोरी वन कक्षात अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रेती भरलेला ट्रॅक्टर न थांबविता राजेंद्र व त्यांच्या सहकाऱ्याच्या अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांनी दराटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून लक्ष्मीकांंत बमाजी केंद्रे, ज्ञानेश्वर दहीफळे आणि पार्डी खुर्द येथील २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैनगंगेच्या पात्रातून गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन होत असून तस्कर हल्ला करण्यासही मागे पाहत नाही.