संभाजी राजे उत्तम साहित्यिक होते

By Admin | Updated: May 14, 2017 01:16 IST2017-05-14T01:16:56+5:302017-05-14T01:16:56+5:30

शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी सातसतक, नाईकाभेद, बुद्धभूषण या सारखे ग्रंथ लिहिले.

Sambhaji Raje was a great litterateur | संभाजी राजे उत्तम साहित्यिक होते

संभाजी राजे उत्तम साहित्यिक होते

अमोल मिटकरी : महागाव येथे जयंती उत्सव
महागाव : शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी सातसतक, नाईकाभेद, बुद्धभूषण या सारखे ग्रंथ लिहिले. ते एक उत्तम साहित्यीक संस्कृत पंडीत होते. त्यांच्याप्रमाणे शंभूप्रेमींनी साहित्य, कला व शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी येथे केले.
छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यता आले होते. अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष उदय नरवाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी, सुनील नरवाडे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक तेजस नरवाडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुदर्शन कदम, शहराध्यक्ष गणेश भोयर उपस्थित होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी संभाजी राजे यांची शौर्यगाथा उलगडून दाखविली. संभाजी राजे यांचा ढाल-तलवारी पलिकडचा इतिहास सांगितला. प्रास्ताविक तेजस पाटी यांनी तर संचालन सुप्रिया नरवाडे यांनी केले.
या कार्यक्रमात बिना हुंड्याने लग्न रणरणारे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हुंडा बंदीची शपथही घेण्यात आला. या कार्यक्रमाला शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Raje was a great litterateur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.