अंजी येथे शहिदांना मानवंदना
By Admin | Updated: October 27, 2016 01:00 IST2016-10-27T01:00:14+5:302016-10-27T01:00:14+5:30
अंजी (नृ) येथील जिल्हा परिषद शाळेत शहिदांना मानवंदना देण्यात आली. अंजीचे सुपुत्र सीआरपीएफ जवान शहीद ...

अंजी येथे शहिदांना मानवंदना
घाटंजी : अंजी (नृ) येथील जिल्हा परिषद शाळेत शहिदांना मानवंदना देण्यात आली. अंजीचे सुपुत्र सीआरपीएफ जवान शहीद गुलाबराव तिमाजी रणदिवे यांना श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. रणदिवे यांना १९९७ मध्ये श्रीनगर येथे तैनातीवर असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरगती प्राप्त झाली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार गणेश भावसार, सरपंच ताई कनाके, गजानन भोयर, नितीन भोयर, पोलीस पाटील हरिभाऊ निकम, माणिक मेश्राम, राजू नारायणे, शारदा तिवारी, भाऊ अंजीकर, विभा अंजीकर, अजय पारधी आदी उपस्थित होते.
ठाणेदार गणेश भावसार म्हणाले, देशाचे रक्षण करताना येणारे वीरमरण हे भाग्य आहे आणि ते चिरकाळ स्मरणात राहते. शहीद सैनिकाचे वर्गमित्र रावजी मेश्राम, श्यामजी खंदार यांनी आठवणींना उजाळा दिला. संचालन वंदना कोवे, आभार देवयाणी कोडापे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विलास डोमाळे, विजय खोडे, साधना मामीडवार, उषा घोडाम, शीतल दीडशे, राजू शेंडे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)