ताडीच्या नावाखाली विषारी द्रावणाची विक्री

By Admin | Updated: May 15, 2014 23:59 IST2014-05-15T23:59:17+5:302014-05-15T23:59:17+5:30

तालुक्यात कुठेही शिंदीचे झाड उपलब्ध नसताना शहरात मात्र ताडीची विक्री होत आहे. ताडीच्या नावाखाली चक्का विषारी द्रावणाची विक्री होत असल्याची माहिती

Sale of toxic solution in the name of Tadi | ताडीच्या नावाखाली विषारी द्रावणाची विक्री

ताडीच्या नावाखाली विषारी द्रावणाची विक्री

प्रकाश सातघरे - दिग्रस

तालुक्यात कुठेही शिंदीचे झाड उपलब्ध नसताना शहरात मात्र ताडीची विक्री होत आहे. ताडीच्या नावाखाली चक्का विषारी द्रावणाची विक्री होत असल्याची माहिती असून अनेक तरुण नशेच्या आहारी गेले आहे. राजरोसपणे या ताडीची विक्री होत असताना कारवाई मात्र केली जात नाही.

अण्णाची ताडी या नावाखाली दिग्रस शहरात विषारी द्रावण विकले जात आहे. विशेष म्हणजे तालुक्यात ताडी हे नाव काही वर्षांंपूर्वी कुणालाही माहीत नव्हते. परंतु आता शहरात खुलेआम ताडी विकली जात आहे. अत्यल्प पैशात दारुपेक्षाही अधिक नशा या ताडीतून मिळत आहे. त्यामुळे मद्यपी आकर्षित होत आहे. पांढरी शुभ्र दिसणारी ही ताडी बनावट असल्याचा संशय आहे. वास्तविक ताडीचे वृक्षही तालुक्यात कुठेही दिसत नाही. संपूर्ण जिल्हय़ातही ताडीच्या वृक्षाचा अभाव आहे. अशा स्थितीत दिग्रसमध्ये ताडी दररोज येते कुठून हा संशोधनाचा विषय आहे.

तांदुळाच्या पाण्यात पांढर्‍या रंगाची पावडर टाकून त्याची ताडी म्हणून विक्री सुरू आहे. एकप्रकारे अनेक तरुण या ताडीच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. ताडीच्या नावाखाली विष पाजण्याचाच हा प्रकार आहे. दहा रुपये ग्लासाप्रमाणे ताडी विकली जात आहे. अनेक तरुण बेरोजगार या ताडीच्या आहारी गेलेले आहेत. ताडी विकणारा तो अण्णा कोण, त्याला पाठबळ कुणाचे, अशी चर्चा आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना पोलीस मात्र गप्प का, असा सवालही विचारला जात आहे. आरोग्यास अपायकारक ठरणार्‍या या विषारी द्रावण विक्रेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Sale of toxic solution in the name of Tadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.