शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

'त्या' बॅचमधील सहा औषधांच्या विक्रीवर राज्यभरात मनाई ! सहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूला ठरले कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:20 IST

एफडीएचे आदेश : बालकाच्या मृत्यू प्रकरणानंतर खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब तालुक्यातील परसोडी येथील सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. मृत्यूपूर्वी या बालकाने यवतमाळातील एका खासगी रुग्णालयातून सर्दी, ताप आणि खोकल्यासाठी औषधे घेतली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी म्हणून बालकाला देण्यात आलेल्या सहा औषधांचे नमुने घेण्यात आले असून त्या बॅचच्या औषधांचे वितरण व विक्री करू नये, असे आदेशही औषधी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

शिवम सागर गुरनुले रा. पिंपळखुटी ता. कळंब असे मृत बालकाचे नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी पालकांनी त्याला ताप, खोकला व उलटी यांसारख्या त्रासासाठी तारक बाल रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार घेऊन बालकाला घरी नेण्यात आले. नंतर पुन्हा ६ ऑक्टोबर रोजी शिवमला तपासणीसाठी डॉ. तारक यांच्याकडे आणले. औषधी बदलवून शिवमला गावी नेण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी शिवम जेवण करीत असताना अचानक कोसळला. त्याच अवस्थेत पालकांनी शिवमला डॉ. तारक यांच्याकडे आणले. तेव्हा डॉक्टरांनी शिवमचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर शिवमच्या मृतदेहाची वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शवचिकित्सा करण्यात आली.

औषधी प्रशासनाने याप्रकरणी तारक बाल रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमध्ये असलेल्या सात औषधांचे नमुने घेतले. शिवमला देण्यात आलेल्या औषधांची बॅच तपासून त्या बॅचच्या सर्वच औषधांची विक्री व वितरण थांबविण्यास सांगितले. सहा औषधांचे नमुने मुंबई येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तूर्त त्या बॅचच्या सहा औषधांवर संपूर्ण राज्यातच बंदी घातली आहे, असे सहायक आयुक्त औषधी एम. के. काळेश्वरकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.

'त्या' बालकाच्या श्वसननलिकेत आढळले अन्नाचे कण

शिवम गुरनुले या सहा वर्षाच्या बालकाची शवचिकित्सा केली असता प्रथमदर्शनी त्याच्या श्वसननलिकेमध्ये शेंगदाण्याच्या सालीसोबत अन्नाचे अंश आढळले. पुढील तपासणीसाठी त्याचे अवयव व व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवमचा खोकल्याच्या औषधामुळेच मृत्यू झाला, हा अंदाज बांधणे चुकीचे आहे. संपूर्ण तपासणी अहवाल हाती आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण पुढे येईल. नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने खोकल्याचे औषध व उपचार घ्यावे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Statewide Ban on Six Medicines After Child's Death in Yavatmal

Web Summary : Following a six-year-old's death in Yavatmal after consuming medicines for cold and cough, a statewide ban has been imposed on six batches of those medicines. Authorities are investigating the cause of death, with initial findings suggesting food particles in the child's respiratory tract.
टॅग्स :YavatmalयवतमाळHealthआरोग्य