यवतमाळात रविवारी ‘सखी सन्मान’ सोहळा
By Admin | Updated: October 21, 2016 02:09 IST2016-10-21T02:09:13+5:302016-10-21T02:09:13+5:30
स्त्री शक्तीच्या अतुलनीय कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सन्मान सोहळ््याचे

यवतमाळात रविवारी ‘सखी सन्मान’ सोहळा
कर्तृत्वाला सलाम : रवींद्र व स्मिता कोल्हे, रजिया सुलताना, आरती फुपाटे यांची उपस्थिती
यवतमाळ : स्त्री शक्तीच्या अतुलनीय कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सन्मान सोहळ््याचे आयोजन रविवार २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात आले आहे. या सेवाव्रतींचा सत्कार मेळघाटात आंतरिक तळमळीतून वैद्यकीय सेवा करणारे डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे आणि महिला अत्याचार व समस्यांविरुद्ध लढणाऱ्या अमरावतीच्या रजिया सुलताना यांच्या हस्ते होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सेवाव्रतींचा, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान लोकमत सखी मंच करीत आहे. या सखींच्या कर्तृत्वाला सत्काररुपी सलाम करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक, शौर्य, आरोग्य, शैक्षणिक, व्यवसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यीक या क्षेत्रात ध्येयाने काम करणाऱ्या महिलेची निवड करण्यात येत आहे. तसेच आपले जीवन सेवेसाठी समर्पित करणाऱ्या महिलेला ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या सन्मान सोहळ््याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे आणि अमरावतीच्या रजिया सुलताना, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे उपस्थित राहणार आहे. कुपोषणाची राजधाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात कोल्हे दाम्पत्य अविरत वैद्यकीय सेवा देत आहे. डोंगरदऱ्यात असलेल्या बैरागड या गावी राहून त्यांनी परिसरातील आदिवासींसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. केवळ दोन रुपये शुल्क घेऊन ते गत ३० वर्षांपासून या भागात कार्यरत आहेत. डॉ. स्मिता कोल्हे या त्यांच्या धर्मपत्नी असून, पतीच्या पावलावर पाऊल ठेऊन त्याही ध्येयवेडेपणाने आदिवासींची सेवा करतात. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या बैरागड येथे जेव्हा त्यांनी पहिले पाऊल ठेवले त्यावेळी रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या. केवळ आंतरिक तळमळीतून हे सेवाव्रती दाम्पत्य त्याठिकाणी आजही अविरत सेवा देत आहे.
अमरावतीच्या रजिया सुलताना या महिला विषयक समस्यांवर कार्यरत आहेत. समाजात हेटाळणीचा विषय ठरणारे तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिला, महिला कैदी यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहतात. त्या केवळ उपदेश करित बसल्या नाही तर या लोकांत मिसळून त्यांनी काम केले. कष्टकरी महिलांवर निरिक्षणातून लेख लिहिले. वंचितांसाठी कार्य करणाऱ्या रजिया सुलताना या सामाजिक कार्यकर्त्या, मुक्त पत्रकार, लेखिका, कवयत्री आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यपद, १४ इस्लामी राष्ट्रात शांतीदूत म्हणून कार्य केले आहे. त्यांना नॅशनल फाऊंडेशन, महाराष्ट्र फाऊंडेशन,विदर्भ साहित्य संघ यासह अनेक पुरस्कार मिळाले आहे. अशा या सेवाव्रतींच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव होणार आहे.
या गौरव सोहळ््याच्यानिमित्ताने उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यात कार्य करणाऱ्या महिलांच्या या गौरव सोहळ््याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दर्डा मातोश्री सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)