सागवान टोळी पुसद वनविभागाच्या ताब्यात
By Admin | Updated: October 3, 2014 02:15 IST2014-10-03T02:15:28+5:302014-10-03T02:15:28+5:30
अवैध वृक्षतोड करणारी तेलंगाणातील टोळी काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या गस्ती पथकाने हिमायतनगर येथे पकडली होती.

सागवान टोळी पुसद वनविभागाच्या ताब्यात
पुसद : अवैध वृक्षतोड करणारी तेलंगाणातील टोळी काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या गस्ती पथकाने हिमायतनगर येथे पकडली होती. या प्रकरणी उमरखेड वनविभागाचा तपास अटोपल्यानंतर पुढील तपासासाठी सर्व आरोपींना पुसद वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्या अनुषंगाने आरोपींना पुसदजवळी जंगलात झालेल्या वृक्षतोडीची ओळख करुन घेण्यात आली. १३ सप्टेंबर रोजी आढळलेल्या मेटॅडोअरचीसुद्धा यावेळी ओळख करुन घेण्यात आली.
स्थानिक निजामाबाद येथील रहिवाशी शे. अहेमद शे. रब्बाणी, शे.शौकत शे. ख्वाजा, खलील खान अहेमद खान, मुखीदबीन अ. चाऊस, सै.आबेद सै.अहेसास, शे.परवेझ शे.मुनिर यांना हिमायतनगर येथील पुलाजवळ काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या पथकाने पकडले होते. अवैध वृक्षतोड प्रकरणाबाबत खंडाळा कक्ष क्र . ३९८ मध्ये जाऊन कटाई केलेल्या सागवान थुटांची ओळख करुन घेण्यात आली. त्याचप्रमाणे सिंगद येथे जाऊन जप्त मेटॅडोर क्र . अे.पी.१५, डब्लु. १३२९ व त्यातील २९ सागवान नग आकार ३.२७६ घन मीटर याचीसुद्धा ओळख करुन तपास करण्यात आला. आरोपींना पुसद न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असून डी.एफ.ओ. सुरेश अलुरवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा.वनसंरक्षक रमेश राठोड, संजय खंदारे, वनपाल खंडाळा एस.एम. खेकाळे, पुसद मनोहर पुंड, वनरक्षक, नाना मस्के, गदले, बोबडे व ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)