शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सालगड्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 21:48 IST

व्यवस्था आता सुधारली आहे म्हणतात. शिक्षणाची दारे सर्वांनाच खुली झाली आहे म्हणतात... पण हे खरे नाही.. गरिबांच्या लेकरांसाठी अजूनही उच्च शिक्षणाची दारे मोफत उघडत नाही. एका साध्या सालगड्याने आपल्या पोराला डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगले.

ठळक मुद्देबंदीभागातील गुणवत्तेची कसोटी : ‘नीट’मध्ये मिळविले ३९३ गुण, प्रवेश शुल्कासह निवासाचाही प्रश्न

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : व्यवस्था आता सुधारली आहे म्हणतात. शिक्षणाची दारे सर्वांनाच खुली झाली आहे म्हणतात... पण हे खरे नाही.. गरिबांच्या लेकरांसाठी अजूनही उच्च शिक्षणाची दारे मोफत उघडत नाही. एका साध्या सालगड्याने आपल्या पोराला डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगले. पोरगाही जीव लावून शिकला, देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण करून एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पात्र ठरला. पण आता मुंबईच्या महाविद्यालयाची फी भरण्याची सोयच नाही. अभ्यासासाठी त्याने जागून काढलेल्या रात्री... त्याच्या वडिलांनी गाळलेला घाम... यशस्वी होण्यासाठी एवढी किंमत पुरेशी नाही का?तालुक्यातील दुर्गम बंदीभागातील जेवली नावाच्या गावातील मेहनती बाप-लेकाची ही संघर्ष काहीणी आहे. अरविंद गुलाब पडवाळे या विद्यार्थ्यांपुढे डॉक्टर होण्यासाठी पैसा आडकाठी होऊन उभा राहिला आहे. जेवली गावातील मथुरानगरमध्ये पडवाळे हे गरीब कुटुंब राहते. गुलाब पडवाळे हे लोकांच्या शेतात सालगडी म्हणून राबतात. त्यांची पत्नीही रोजमुजरी करते. आपला हुशार मुलगा अरविंद डॉक्टर व्हावा, ही त्यांची इच्छा. त्यासाठी त्यांनी काबडकष्ट करीत त्याला बारावीपर्यंत शिकविले.अरविंद दहावीपर्यंत जेवलीच्याच राजारामबापू पाटील विद्यालयात शिकला. दहावीत ८८ टक्के गुण घेतल्यावर ढाणकीच्या संत गाडगे महाराज विजाभज उच्च माध्यमिक विद्यालयात गेला. २०१६ मध्ये तो ७१ टक्के गुणांसह बारावी झाला. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन तो पुढील शिक्षणासाठी नांदेडला गेला. सीईटी दिली. पहिल्या प्रयत्नात १४१ गुण मिळाले. हिंमत न हारता त्याने ‘नीट’ परीक्षा दिली. त्यात ३५७ गुणच मिळाल्याने एमबीबीएसला नंबर लागला नाही. पुन्हा परीक्षा दिल्यावर मात्र ३९३ गुणांसह तो एमबीबीएस प्रवेशाला पात्र झाला. मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजसाठी त्याचा नंबर लागला आहे.परंतु, सालगडी असलेल्या वडिलांकडे आता एमबीबीएसची फी भरण्याची सोयच नाही. अरविंदचा डीएड झालेला भाऊही पुण्यात खासगी कंपनीत काम करतो. दोन बहिणींचे लग्न झाले आहे.फक्त तीन दिवसात जमणार का पैसा?गुलाब पडावळे या गरीब माणसाने अत्यंत काबाडकष्ट उपसत अरविंदला शिकविले. डॉक्टरकीच्या दारापर्यंत पोहोचविले. पण आता एमबीबीएस प्रवेशाचे दार रग्गड पैशाविना उघडायला तयार नाही. फी भरण्याची १२ जुलै ही अंतिम मुदत आहे. दोन दिवसात जर पैशांची तजविज झाली नाही, तर आपल्या हुशार मुलाचे काय होणार या चिंतेने वडील गुलाब आणि आई पतियाबाई बेजार आहेत. कोणी येईल का त्यांच्या मदतीला धावून?

टॅग्स :Medicalवैद्यकीय