सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:25 IST2017-09-03T23:25:21+5:302017-09-03T23:25:52+5:30

औरगांबाद येथे एका महिला एसटी वाहकाचा प्रवासादरम्यान गर्भपात झाला होता.

Safe maternity celebration | सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव

सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव

ठळक मुद्देनेर आगार : महिला वाहकांना मिळणार नऊ महिन्यांची प्रसुती रजा

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : औरगांबाद येथे एका महिला एसटी वाहकाचा प्रवासादरम्यान गर्भपात झाला होता. सदर प्रकरण ‘लोकमत’ने समोर आणले होते, याची दखल घेत आता महिला वाहकांना प्रसुती काळासाठी मिळणारी सहा महिण्यांची रजा नऊ महिण्यांची करण्यात आली आहे. या बाबीचा संपूर्ण महाराष्ट्रात आंनदोत्सव साजरा होत असतानाच राज्यातील चार हजार पाचशे महिलांना यामुळे आधार मिळाला आहे. मात्रृत्व रजा नऊ महिन्यांची झाल्याचा आंनद नेर आगारात साजरा करण्यात आला.
प्रशासनाच्या वतीने महिला कर्मचाºयांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आगार व्यवस्थापक दीप्ती वड्डे, प्रमोदिनी किनाके, आगार लेखाकार मयुरी गोरले आदी उपस्थित होत्या. प्रशासकीय कर्मचारी, सचिन ढळे यांनी महिला कर्मचाºयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांना येणाºया अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने हा सोहळा साजरा करण्यात आला. त्या शिला नाईकवाडे यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवंरानी विचार व्यक्त करून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रक गायकवाड, गोंडाने, बेलेबाबू , नितीन चव्हान, मानवटकर, गेडाम, लिपिक गायनर, पेचकाळै, भगत , खांदेल, खसाळे, कुमरे, जगनाळे, काकडे, चिमोटे, बनसोड आदींसह रूखमा मानवटकर, प्रियंका चिमोटे, दुर्गा गेडाम, कल्पना इरपाते, चैताली काकडे, मनिषा ढबाले, सीमा भगत, वनिता लव्हाळे, रिता सयाम, प्रगती वारे, मंजू खांदेल, प्रिया खडसे, रूची पांडे, सरिता कुमरे आदीं वाहक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Safe maternity celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.