सफारीची ट्रॅक्टरला धडक...
By Admin | Updated: May 9, 2016 02:32 IST2016-05-09T02:32:46+5:302016-05-09T02:32:46+5:30
दिग्रस तालुक्यातील सेवानगर फाट्याजवळ भरधाव टाटा सफारी कारची ट्रॅक्टरला धडक लागली.

सफारीची ट्रॅक्टरला धडक...
सफारीची ट्रॅक्टरला धडक... दिग्रस तालुक्यातील सेवानगर फाट्याजवळ भरधाव टाटा सफारी कारची ट्रॅक्टरला धडक लागली. ही घटना रविवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात टाटा सफारीतील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना पुसदच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर टाटा सफारी लग्नसमारंभावरून पुसदवरून दिग्रसकडे येत होती. त्यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक लागली आणि अपघात झाला.