चातुर्मासानिमित्त साध्वीजी ढाणकीत
By Admin | Updated: July 24, 2015 02:08 IST2015-07-24T02:08:27+5:302015-07-24T02:08:27+5:30
जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास ३० जुलैपासून सुरू होत आहे. चातुर्मासाच्यानिमित्ताने जैन साध्वी पुण्यस्मिताजी म.सा.

चातुर्मासानिमित्त साध्वीजी ढाणकीत
ढाणकी : जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास ३० जुलैपासून सुरू होत आहे. चातुर्मासाच्यानिमित्ताने जैन साध्वी पुण्यस्मिताजी म.सा. आणि प्रणिदीजी म.सा. यांचे ढाणकीत बुधवारी आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मद्रास, चंद्रपूर, हिंगोली, सेलूमानवत, पुसद, उमरखेड, विडूळ आदीसह ढाणकीतील शिष्यगण उपस्थित होते.
ढाणकी येथे जैन धर्मियांतर्फे वर्षावास २०१५ च्यानिमित्ताने चातुर्मासात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जप-तप, स्वाध्याय, साधना, उपवास, धर्म जागृती, ज्ञान, ध्यान या बीबींचा समावेश आहे. चातुर्मासानिमित्त ढाणकीत प्रतिभा कवरजी यांच्या शिष्या पुण्यस्मिताजी व प्रणिदीजी यांच्या स्वागतार्थ मंगलकलशधारी महिलांची उपस्थिती होती. साध्वीजींना जैन स्थानकापर्यंत घेवून गेलेल्या पदयात्रेतील बंधूभगिनींकडून जैन धर्म व साध्वीजींचा जयजयकार करण्यात आला. ३० जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या चातुर्मासानिमित्त ढाणकी व परिसरातील जनतेने या प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)