ग्रामीण खेळाडूंची विभागीय स्तरावर भरारी
By Admin | Updated: October 27, 2016 01:07 IST2016-10-27T01:07:42+5:302016-10-27T01:07:42+5:30
परिसरातील कवडीपुरा तांडा येथील खेळाडूंनी आपल्या खेळाची चुणूक दाखवून विभागीय स्तरासाठी निवड निश्चित केली आहे.

ग्रामीण खेळाडूंची विभागीय स्तरावर भरारी
पुसद : परिसरातील कवडीपुरा तांडा येथील खेळाडूंनी आपल्या खेळाची चुणूक दाखवून विभागीय स्तरासाठी निवड निश्चित केली आहे. ग्रामीण भागातील या खेळाडूंच्या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र क्रीडा युवक संचालनालय पुणे यांच्यामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकूल येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये कवडीपुरा तांडा येथील गुणवंतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. १४ वर्षीय गटामध्ये लांब उडीमध्ये शिवाणी पटेल हिने प्रथम क्रमांक, सृष्टी पवार द्वितीय, कीर्ती दळवे, आश्लेषा पवार, हर्षदा राठोड या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले. १७ वर्ष वयोगटात सुरज परघरमोल, ऋषिकेश बाभळे, दिव्याणी राठोड, निकीता ठोंबरे, प्रियंका आढाव, शीतल खंदारे, आयुष राठोड व सिद्धार्थ जाधव या खेळाडूंनी क्रमांक पटकाविले.
१९ वर्ष वयोगटात सागर किरोले, संदेश पावडे, आरती चव्हाण, अपेक्षा ठाकरे, दिव्या जाधव, सुजाता नरवाडे व शिवाणी राठोड या खेळाडूंनी लांब उडी, भाला फेक आदी खेळांमध्ये बाजी मारली. रिलेमध्ये अपेक्षा ठाकरे, दिव्या जाधव, सुजाता नरवाडे, आरती चव्हाण व शिवाणी राठोड या खेळाडूंनी चमकदार कामगिरीने आपले लक्ष वेधून घेतले. त्यामुळे या खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक अविनाश कऱ्हाळे, सुनील देशमुख यांना दिले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून सहकार्य केले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)