पुन्हा चालणार बुलडोजर

By Admin | Updated: February 3, 2015 23:02 IST2015-02-03T23:02:16+5:302015-02-03T23:02:16+5:30

शहरासोबतच दहा नगरपरिषद क्षेत्रातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी, तहसीलदार यांना दिले आहेत.

Running Bulldozer | पुन्हा चालणार बुलडोजर

पुन्हा चालणार बुलडोजर

जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश : नगरपरिषदा तयार करणार कृती आराखडा
यवतमाळ : शहरासोबतच दहा नगरपरिषद क्षेत्रातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी, तहसीलदार यांना दिले आहेत. मार्च अखेरपर्यंत सर्वच नगरपरिषदांना ही मोहीम राबवायची आहे.
वाहतूकस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी त्या त्यास्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यवतमाळ शहरातील पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर मोहीम थांबविण्यात आली होती. आता पुन्हा उरलेल्या दाराव्हा, पांढरकवडा मार्गसह शहरातील अंतर्गत रस्त्यावर असलेले व्यावसायीक अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहे. यवतमाळ शहरात फेबु्रवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली आहे. साधनांची उपलब्धता पाहून तालुकास्तरावर सुध्दा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून रस्त्यावर मार्कींग केले जाणार आहे. त्यानंतर लगेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. याची प्रमुख जबाबदारी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांवर आहे. त्यांना सहाकार्य करण्याचे निर्देश इतर यंत्रणेला देण्यात आले आहे. सीईओंना सहकार्य व्हावे यासाठीच मंगळवारी दुपारी संयुक्त बैठक घेतल्याचे जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Running Bulldozer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.