आरटीओत एकाच दिवशी १३०० वाहने
By Admin | Updated: April 1, 2017 00:14 IST2017-04-01T00:14:08+5:302017-04-01T00:14:08+5:30
न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. ही बंदी १ एप्रिलपासून लागू होत असल्याने

आरटीओत एकाच दिवशी १३०० वाहने
पासिंगसाठी रांगा : उशिरापर्यंत नोंदणी सुरूच
यवतमाळ : न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. ही बंदी १ एप्रिलपासून लागू होत असल्याने शेवटच्या दिवशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अशा जवळपास १३०० वाहनांची पासिंगसाठी गर्दी झाली होती.
न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरूवारी रात्रीच अनेकांनी शोरूमकडे धाव घेतली. रात्री दीड वाजतापर्यंत वाहनांचे शोरूम सुरू होते. गुरूवारी ४१५ वाहनांची आरटीओत नोंदणी झाली. यात बहुतांश बीएस-३ वाहनांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पुन्हा शोरूमकडे धाव घेतली. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या मुर्हूतावर नसेल इतकी गर्दी सवलतीच्या दारातील वाहन खरेदीसाठी दिसून आली. हेच वाहन घेऊन नोंदणीसाठी आरटीओ कार्यालय गाठण्यात आले. त्याकरिता सर्वच डिलरकडून आरटीओच्या कॅश काऊन्टरवर वाहनांची यादी व नोंदणी शुल्क जमा करण्यात आले. दुपारी २ वाजता बंद होणारे आरटीओचे कॅश काऊन्टर शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होते.
हिरोच्या ८००, होंडाच्या ३०० दुचाकी, टीव्हीएसच्या ६५, तर इतर कंपन्याची १०० दुचाकी वाहने नोंदणीसाठी आली होती. (कार्यालय प्रतिनिधी)