शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शिक्षकाकडून एक लाखांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अडकला, दीड लाख मागून मानसिक त्रास

By विलास गावंडे | Updated: January 24, 2024 18:12 IST

ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

आर्णी (यवतमाळ) : माहितीच्या अधिकारात वैयक्तिक माहिती मागून शिक्षकाला खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुध्द आर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड लाख रुपयांची मागणी या शिक्षकाला करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

चिकणी (ता.आर्णी) येथील गणपतराव पाटील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे प्राथमिक शिक्षक साहेबराव मोहाड यांच्याविषयी आयता (ता.आर्णी) येथील अभिजीत मधुकर मडावी याने वैयक्तिक स्वरूपाची माहिती प्रकल्प अधिकारी आणि अपर आयुक्तांकडे मागितली.  होती. माहितीचा अर्ज मागे घेण्यासाठी त्याने शिक्षक मोहाड यांना दीड लाख रुपयांची मागणी केली. शिक्षकाने ही मागणी मान्य करून पहिला हप्ता एक लाख रुपये देण्याचे कबूल केले. 

या सर्व घडामोडीनंतर त्यांनी आर्णी येथील ठाणेदार केशव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आपबिती सांगितली. दरम्यानच्या काळात अभिजीत मडावी याने शिक्षकाला विविध ठिकाणी बोलाविले. ठाणेदारांनी खातरजमा करून २३ जानेवारी रोजी सापळा रचला. आर्णी येथील बाबा कम्बलपोष दर्गाजवळ भाजी मार्केटरोडवर शिक्षकाजवळून एक लाख रुपये स्वीकारताना मडावी याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द कलम ३८४. ३८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग