शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

५० रुपयांचा मास्क २५० रुपयात ग्राहकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 5:00 AM

इंदिरा गांधी मार्केट परिसरात मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० रुपयापासून १५० रुपयापर्यंत विक्री केला जात आहे. तीन पदरी व दोन पदरी प्रकारातील मास्क येथे उपलब्धच नाही. तर प्रीस मास्क या ब्रॅन्डवर चक्क २१४ रुपयांची प्रिंटेड प्राईज आहे. मात्र मी हा मास्क फक्त मुद्दलमध्ये म्हणजे १५० रुपयांना विकत असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यातही ईअर लुप्स आणि हेड लुप्स मास्कच्या किंमती कमी अधिक आहेत. 

ठळक मुद्देयवतमाळात शासकीय दरपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता, मनमानी पद्धतीने विक्री, स्थानिक प्रशासनाकडूनही दुर्लक्ष 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या संकटात भीतीचा आडोसा घेऊन सर्वसामान्यांना लुटण्याचा प्रकार औषध विक्रेत्यांकडून केला जात आहे. शासनाने केवळ ४९ रुपये इतका दर निश्चित केला असताना शहरात हा मास्क कुठे १००, कुठे १५० तर कुठे २५० रुपयांना ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. शासन निर्णयाप्रमाणे यवतमाळात कोणत्याही मेडिकल स्टोअरने मास्कच्या दरपत्रकाचा फलक लावलेला नाही. गंभीर म्हणजे मास्कवर एमआरपी नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. शिवाय मास्कचे बीलही मिळत नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे खुद्द अन्न व औषध              प्रशासनाचे म्हणणे आहे. 

मी तर मुद्दलमध्येच विकत आहेइंदिरा गांधी मार्केट परिसरात मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० रुपयापासून १५० रुपयापर्यंत विक्री केला जात आहे. तीन पदरी व दोन पदरी प्रकारातील मास्क येथे उपलब्धच नाही. तर प्रीस मास्क या ब्रॅन्डवर चक्क २१४ रुपयांची प्रिंटेड प्राईज आहे. मात्र मी हा मास्क फक्त मुद्दलमध्ये म्हणजे १५० रुपयांना विकत असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यातही ईअर लुप्स आणि हेड लुप्स मास्कच्या किंमती कमी अधिक आहेत. 

स्वस्त सुविधा केंद्रातही महागाई सिव्हील लाईन परिसरातील तीन-चार मेडिकल स्टोअरमध्ये एन्-९५ मास्क १२५ ते २५० रुपयांना विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे यात स्वस्त सुविधा केंद्राचाही समावेश आहे. तेथे तीन पदरी मास्क १० रुपये किंमतीला दिला जात आहे. तर दोन पदरी मास्क उपलब्धच नाही. या परिसरात दवाखान्यांची संख्या अधिक असल्याने येथून मास्कचा उठावही अधिक आहे. मात्र कुठेही            दरपत्रकाचा थांगपत्ता दिसला नाही. 

सरकारच्या किमतीत आमचा तोटायवतमाळच्या चर्च रोड परिसरात तीन ते चार मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० ते १५० रुपयांना उपलब्ध आहे. मात्र येथील जेनेरिक स्टोअर चालकाने वेगळीच व्यथा मांडली. सरकारची किमत खूप कमी आहे. त्यापेक्षा आमची पर्चेस प्राईजही जास्त आहे. मग आम्ही तोट्यात मास्क विकायचे का? असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही जुने मास्क संपल्यानंतर नवीन स्टाॅकच मागविला नाही, अशी व्यथा या दुकानदाराने व्यक्त केली. 

.. म्हणून कारवाई करता येत नाहीमहागात विकला जाणारा जुना स्टाॅक असावा. केएन-९५ मास्कचा शासन निर्णयात उल्लेख नसल्याने त्यावर आमचे नियंत्रण नाही. शिवाय मास्क ड्रगमध्ये मोडण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूत मोडते. त्यामुळे या संदर्भात आम्हाला कारवाई करता येत नाही.   - मनीष गोतमारे, अन्न व औषध             प्रशासन अधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या