रोटरी मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:23 IST2019-07-29T21:23:41+5:302019-07-29T21:23:54+5:30
रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा येथील बचत भवनात पार पडला. यावेळी २०१९-२० करिता अध्यक्ष म्हणून दिलीप हिंडोचा यांना मावळते अध्यक्ष अतुल मांगुळकर यांनी पदभार सोपविला. रोटॅक्ट (युवा) क्लबचे अध्यक्ष म्हणून महेश जाधव व नवनिर्वाचित सदस्यांना रोटरी पीन देऊन सन्मानित करण्यात आले.

रोटरी मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा येथील बचत भवनात पार पडला. यावेळी २०१९-२० करिता अध्यक्ष म्हणून दिलीप हिंडोचा यांना मावळते अध्यक्ष अतुल मांगुळकर यांनी पदभार सोपविला. रोटॅक्ट (युवा) क्लबचे अध्यक्ष म्हणून महेश जाधव व नवनिर्वाचित सदस्यांना रोटरी पीन देऊन सन्मानित करण्यात आले.
सचिव अॅड. प्रवीण दर्डा यांना मावळते सचिव विजय गंडेचा यांनी पदभार सोपविला. अतुल मांगुळकर यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. अध्यक्ष दिलीप हिंडोचा यांनी पुढील काळात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी राबविल्या जाणाºया कामधेनू व गोदान प्रकल्पासाठी माजी आयएएस अधिकारी ललित देशमुख व अंजली देशमुख (पुणे) यांचे आर्थिक सहकार्य लाभणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. प्रमुख पाहुणे राजे संग्रामसिंग भोसले, उपप्रांतपाल जलालुद्दिन गिलाणी होते. प्रसंगी राजेंद्र भांबरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. संचालन नीलेश ढुमे, प्रांजली ढुमे व अमित मोर यांनी केले. नवीन कार्यकारिणीत घनश्याम बागडी, उदय नेमानी, चेतन पारेख, जयप्रकाश जाजू, परेश लाठीवाला, विजय अडतिया, नीलेश ढोणे, रमेश छेडा, विजय शेटे, गोपाल बोरले, किशोर जाजू यांचा समावेश आहे. पदग्रहणप्रसंगी अॅड. मनक्षे, अॅड. दर्डा, देवीदास गोपलानी आदी उपस्थित होते.