यवतमाळात रोटरी महोत्सव
By Admin | Updated: February 12, 2015 01:44 IST2015-02-12T01:44:57+5:302015-02-12T01:44:57+5:30
यंदाही रोटरी क्लब आॅफ यवतमाळच्यावतीने १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय रोटरी महोत्सव आयोजित केला आहे.

यवतमाळात रोटरी महोत्सव
यवतमाळ : यंदाही रोटरी क्लब आॅफ यवतमाळच्यावतीने १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय रोटरी महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव येथील पोस्टल मैदानात पार पडणार आहे.
रोटरी महोत्सवाचे हे सलग पाचवे वर्ष असून सुमारे एक लाखांहून अधिक चौरस फूट जागेत हा महोत्सव पार पडणार आहे. विविध व्यावसाय आणि खाद्य पदार्थाचे १७० पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या विविध प्रकारच्या वस्तू, गृहपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे, बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, सॉफ्टवेअर, रिअल इस्टेट, बँकिंग सेवा, विमा, दुचाकी, चारचाकी वाहने या शिवाय ग्रामीण व शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलचा समावेश राहणार आहे.
या महोत्सवात शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा, यासाठी त्यांना मोफत पासेस दिल्या जाणार आहे. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे प्रकल्प अधिकारी राजेश गडीकर, प्रकल्प अधिकारी जलालुद्दीन गिलाणी, अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, सचिव माधवी राजे, प्रकल्प समन्वयक डॉ.सुरेंद्र पद्मावार, कन्हैया वाधवाणी, सतीश फाटक, विनायक कशाळकर, सतीश बजाज, अब्बास बॉम्बेवाला, अशोक कोठारी, डॉ.नारायण मेहरे, अविनाश ओमवार, देवीदास गोपलाणी आदींनी केले आहे. यशस्वीतेसाठी अॅड.किशोर देवाणी, मंगेश खुने, विशाल गाबडा, प्रदीप गाबडा, संजय वंजारी, अविनाश लोखंडे, डॉ.अविनाश पाचकवडे, आनंद भुसारी, मिलिंद राजे, संजय रत्नानी, मुकुंद औदार्य, अब्दुल बॉम्बेवाला, प्रा.अनंत पांडे, अजय म्हैसाळकर, संजय वंजारी, हरिश राठोड, अभय देशपांडे आदी रोटरी पदाधिकारी परिश्रम घेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)