वेअरहाऊसवरील छत उडाले, पीक उद्ध्वस्त

By Admin | Updated: February 28, 2016 02:31 IST2016-02-28T02:31:52+5:302016-02-28T02:31:52+5:30

वादळ, पाऊस आणि गारांमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

The roof topped the warehouse, destroyed the crop | वेअरहाऊसवरील छत उडाले, पीक उद्ध्वस्त

वेअरहाऊसवरील छत उडाले, पीक उद्ध्वस्त

घरांना हानी पोहोचली : दाभा पहूर येथे १० मिनिटे गारांचा पाऊस
यवतमाळ : वादळ, पाऊस आणि गारांमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. गहू, हरभरा, पपई आदी पिकांना फटका बसला. काही ठिकाणी घराचेही मोठे नुकसान झाले आहे. दाभा येथे १० मिनीट गारांचा पाऊस झाला. पांढुर्णा केदारलिंग येथील केशवराव काईट यांच्या घराची भिंत कोसळली. तसेच टिनपत्रे उडून गेले.
उमरखेड तालुक्यातही याच सुमारास जोरदार वादळ आणि पाऊस झाला. शहरात १५ मिनिटे गारांचा वर्षाव झाला. शहरातील ढाणकी मार्गावरील विनोद कन्नावार यांच्या गोदामाचे छत उडून गेले. या गोदामात असलेला शेकडो क्ंिवटल हरभरा ओला झाला. तर आपला जीन प्रेसचेही छत उडाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली. शहरातील विश्रामगृहासमोर बाभळीचे मोठे झाड कोसळल्याने नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. तालुक्यातील विडूळ आणि बंदी भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याची माहिती आहे. विडूळ ते दिघडी आणि ढाणकी रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
महागावातील बिजोरा, कोठारी, बेलदरी, नांदगव्हाण, हिंगणी, राजुरा, काळीदौलत, सेनद, मोरथ परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाली. सर्वाधिक तडाखा केळी पिकाला बसला. दिग्रस तालुक्यात दोन तास रिमझिम पाऊस बरसला. सिंगद, मांडवा या भागात चांगलाच पाऊस झाला. नेर तालुक्यातील माणिकवाडा, गोंडगव्हाण, दाभापहूर परिसरात लिंबाच्या आकाराची गार झाल्याची माहिती आहे. बाभूळगाव तालुक्यात दहा मिनिटे बोराच्या आकाराची गारपीट झाली. (लोकमत चमू)

अचानक आलेल्या वादळाने जनजीवन विस्कळीत
हरभराचे प्रचंड नुकसान

सध्या हरभरा काढणीला आला असून अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याची कापणी करून ढिग लावले आहे. मात्र शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने काढलेल्या हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी हरभरा झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. हरभऱ्यासोबतच गहू पिकाचेही मोठे नुकसान झाले. केळी, संत्रा आणि पालेभाज्यांना मोठा फटका बसला.

वीज पुरवठा खंडित
वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या असून पुसद शहरासह अनेक गावांचा वीज पुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. वृत्त लिहेस्तोवर वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तसेच अनेक भागात वृक्ष कोसळले. तसेच दूरध्वनी सेवाही खंडित झाली.

बाजार समितीत तूर ओली

पुसद येथील ग्रेन मार्केटमध्ये शनिवारी तुरीची खरेदी सुरू होती. सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने मार्केटमधील हजारो क्ंिवटल तूर ओली झाली. सदर प्रतिनिधीने बाजार समितीचा फेरफटका मारला असता बाजार समितीच्या शेडचे टीनपत्रे उडाली. तसेच शेडमध्ये पाणी शिरल्याने तूर, हरभरा ओला झाला. यावेळी शेतकरी हतबल झाले.

Web Title: The roof topped the warehouse, destroyed the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.