बोरीअरबच्या उर्दू शाळेवरील छप्पर उडाले

By Admin | Updated: May 8, 2016 01:55 IST2016-05-08T01:55:48+5:302016-05-08T01:55:48+5:30

वादळामुळे शुक्रवारी येथील उर्दू शाळेवरील छत उडाले. या प्रकारात पुस्तके आणि विविध वस्तू पावसामुळे ओल्या झाल्या.

Roof from the bariarab's Urdu school blown up | बोरीअरबच्या उर्दू शाळेवरील छप्पर उडाले

बोरीअरबच्या उर्दू शाळेवरील छप्पर उडाले

बोरीअरब : वादळामुळे शुक्रवारी येथील उर्दू शाळेवरील छत उडाले. या प्रकारात पुस्तके आणि विविध वस्तू पावसामुळे ओल्या झाल्या. शनिवारी सकाळी या शाळेतील विद्यार्थी उपयोगात येणारी पुस्तके शोधण्याचा प्रयत्न करीत होते.
शुक्रवारी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. यामुळे काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्ग १ ते ४ पर्यंत येथे असलेल्या उर्दू शाळाही वादळाच्या तडाख्यात सापडली. संपूर्ण छत वादळाने उडाल्यामुळे विविध प्रकारचे कागदपत्र, संगणक आदी साहित्य पावसाने भिजून खराब झाले.
वीज तारांवर झाडे कोसळली. जमिनीवर पडलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने तपोना येथील चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यात ज्ञानेश्वर महल्ले, धनसिंग चव्हाण, रमेश जाधव, देवराव चव्हाण यांच्या जनावरांचा समावेश आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाथ्रड येथे लाडखेड येथील ११ केव्ही उपकेंद्रावरून वीज गेली आहे. सकाळी पाथ्रट देवी मार्गावरील वीज पुरवठा सुरू करण्यात आला. झाडे कोसळल्याने रस्त्यावर पडलेल्या वीज तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारला. त्यामुळे तपोना येथील चरावयास जात असलेली जनावरे या तारांना स्पर्श होऊन ठार झाली. याशिवाय तालुक्याच्या काही भागात घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती आहे. (वार्ताहर)

Web Title: Roof from the bariarab's Urdu school blown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.