सहकार क्षेत्रात अर्बन क्रेडिट सोसायटीची भूमिका महत्त्वाची
By Admin | Updated: August 18, 2015 02:46 IST2015-08-18T02:46:51+5:302015-08-18T02:46:51+5:30
सहकार क्षेत्रात अर्बन को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. अशा सोसायट्यांनी

सहकार क्षेत्रात अर्बन क्रेडिट सोसायटीची भूमिका महत्त्वाची
यवतमाळ : सहकार क्षेत्रात अर्बन को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. अशा सोसायट्यांनी शेतकऱ्यांना कर्ज सुविधेसह बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे शनिवारी केले.
गोदावरी नांदेड मल्टीस्टेट अर्बन को-आॅपरेटिव्ह के्रडिट सोसायटी यवतमाळ शाखेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मदन येरावार, आमदार हेमंत पाटील, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उमेश वैद्य, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, संतोष ढवळे, गोदावरी नांदेडच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील उपस्थित होते.
सहकार क्षेत्र पुढे नेल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते. काही मूठभर लोकांनी सहकार क्षेत्राला बदनाम करून स्वत:ची प्रगती केली आहे. अशा लोकांना सहकार चळवळीपासून दूर ठेवले पाहिजे. चळवळीतील पतसंस्था मोठ्या प्रमाणावर पुढे जात आहे. आधुनिक सुविधा व पध्दतीने पतसंस्था उभ्या होत आहे. या पतसंस्थांना बळकट करण्याची गरज आहे, असे पुढे बोलताना ना.भुसे यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री संजय राठोड यांनी गोदावरी सोसायटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार येरावार, आमदार पाटील, उमेश वैद्य, राजुदास जाधव, राजश्री पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, विजय देशपांडे, संजय पिंपळखुटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)