रोहयोचे आधारकार्ड लिंकेज खोळंबले
By Admin | Updated: January 27, 2015 23:40 IST2015-01-27T23:40:15+5:302015-01-27T23:40:15+5:30
रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांची ओळख पटविण्यासाठी आता आधार कार्डचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी मजुरांचे जॉब कार्ड आणि आधार कॉर्ड लिंकेज करण्यात येत आहे.

रोहयोचे आधारकार्ड लिंकेज खोळंबले
यवतमाळ : रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांची ओळख पटविण्यासाठी आता आधार कार्डचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी मजुरांचे जॉब कार्ड आणि आधार कॉर्ड लिंकेज करण्यात येत आहे. मात्र ही मोहीम रखडल्याचे दिसू असून एक लाख ५७ हजार ६९२ मजरा पैकी केवळ ६८ हजार मजुरांचे बँक खाते, जॉब कार्ड, आधार कार्डशी जोडण्यात आले आहे.
मजुुरांचे आधार कार्ड हे एमआयएस (मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम) सोबत जोडले जात आहे. रोहयोवर यापूर्वी अनेक बोगस मजूर दाखवुन मशीनद्वारेच कामे उरकण्यात आली. अनेक कामावर मयत व्यक्तीला मजूर म्हणून दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामात कंत्राटदारांनी केलेली घुसखोरी थांबविण्यासाठीच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून विविध उपाय योजना केल्या जात आहे. या अंतर्गतच एमआयएस प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. थेट उपग्रहाच्या माध्यमातून कामाचे ठिकाण निश्चित केले जात आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष कामावर राबणाऱ्या व्यक्तीलाच मोबदला मिळावा याची तसदी शासनाकडून घेण्यात आली आहे. यासाठी सामाजिक अंकेक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रथमच लेबर बजेट करण्यात आले. यातूनच आधार कॉर्ड एमआयएस सोबत जोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ज्या अपेक्षेने हे काम सुरू केले होते. ते उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)