खडकसावंगा : अपघातात १२ जखमी

By Admin | Updated: May 12, 2014 00:14 IST2014-05-12T00:14:41+5:302014-05-12T00:14:41+5:30

भरधाव टाटा इंडिगो आणि प्रवासी घेऊन जाणार्‍या टाटा मॅजिक या वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले.

Rocks: 12 injured in accident | खडकसावंगा : अपघातात १२ जखमी

खडकसावंगा : अपघातात १२ जखमी

बाभूळगाव : भरधाव टाटा इंडिगो आणि प्रवासी घेऊन जाणार्‍या टाटा मॅजिक या वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील खडकसावंगाजवळ रविवारी दुपारी १२ वाजता घडला. देवगावकडून टाटा मॅजिक क्रमांक एम.एच.२९-टी-८४६० येत होता. दरम्यान खडकसावंगा फाट्यासमोर धामणगावकडे जाणार्‍या टाटा इंडिगो कार क्रमांक एम.एच.२९-एल-९११ ने धडक दिली. या अपघातात प्रदीप मांढरे (२२) रा.नांदुरा, ज्ञानेश्वर मिलमिले (१८) रा. कोळंबी, गणेश वडते (२५) रा. कळंब, नीलेश मेश्राम (२०) रा. नांदुरा, उद्धव खरात (५५) रा. धामणगाव, दुर्गा चामलाटे (१२) रा. कामनापूर, योगिता बावणे (२०) रा. शेंदूरजुना ता.चांदूर, नीलेश सिरसाट (१८) रा. मेंढा ता. कारंजा, सुरेश वरठी (३५) रा. हिरापूर, रणजित बिरे (२८) रा. यवतमाळ, रामचंद्र केवदे (२२) रा. गवंडी, सरोजिनी शेंडे (२०) रा. शेंदूरजना हे प्रवासी जखमी झाले. जखमींनाबाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Rocks: 12 injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.