‘जेडीआयईटी’मध्ये रोबोनन्स-१५ उत्साहात
By Admin | Updated: March 30, 2015 02:06 IST2015-03-30T02:06:22+5:302015-03-30T02:06:22+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभाग आणि ‘मेसा’ क्लबच्यावतीने ‘रोबोनन्स-१५’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

‘जेडीआयईटी’मध्ये रोबोनन्स-१५ उत्साहात
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभाग आणि ‘मेसा’ क्लबच्यावतीने ‘रोबोनन्स-१५’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बक्षीस व प्रमाणपत्र देवून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
उद्घाटन संस्थेचे सचिव किशोर दर्डा, हिमालय कार्सचे व्यवस्थापक देवीदास गोपलानी, विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता पंकज तगडपल्लेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे, ‘मेसा’ क्लब समन्वये प्रा. प्रसाद हातवळणे, विद्यार्थी प्रतिनिधी अभिलाष कांबळे आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रा. सागर जिरापुरे यांनी संचालन केले.
यानंतर झालेल्या पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, डर्ट डॅश (मडरेस), मेगापिक्सेल, शूट द टार्गेट, लाईन फॉलोव्हर, रूबीक क्यूब या स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत आयबीएसएस अमरावतीचा विद्यार्थी साहेल पटेल याने प्रथम पारितोषिक पटकाविले. ‘जेडीआयईटी’चा तेजस काप्रतवार याने द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धेत डीबीएनसीआय आणि जेडीआयईटीच्या चमूला प्रथम पारितोषिक संयुक्तरीत्या देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक केडीके कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग नागपूरच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेंतर्गत मीनल बागुल आणि रोहिनी तलवारे यांनी काढलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. जेडीआयईटीची प्रियंका तलवारे ही उपविजेती ठरली.
डर्ट डॅश स्पर्धेत शुभम कलांडरे, चेतन खराडे, बिपीन सुरतकर या जेडीआयईटीच्या अपेक्स ग्रुपने प्रथम तर याच महाविद्यालयाच्या अभिलाष कारडे, अनुज तुंडलवार आणि अमित मेश्राम यांच्या अभिजित ग्रुपने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. मेगा पिक्सेल स्पर्धेत जेडीआयईटीचा अनुज संगावार याला प्रथम पारितोषिक देण्यात आले. नयन राजपूत द्वितीय बक्षिसाचा मानकरी ठरला. शूट द टार्गेट स्पर्धेत आशीष वानखेडे याने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
लाईन फॉलोव्हर स्पर्धेत अनघा चिकटे, प्रणाली राऊत आणि चंदा दारव्हे या ग्रुपने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. रूबीक क्यूब स्पर्धेत आर्यन दुर्गम याने प्रथम तर आदर्श डोंगारे याला द्वितीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी मेसा क्लबचे समन्वयक प्रा. महेश गोरडे, प्रा. पी.एस. घावडे, प्रा. आर.व्ही. परोपटे, प्रा. आर.के. वाघचोरे, प्रा. टी.बी. काठोळे, प्रा. एन.डी. शिरगिरे, प्रा. पी.आर. बोदडे, प्रा. टी.आर. मोहोड, प्रा. एस.एस. भन्साली, प्रा. एन.जी. जोगी, प्रा. एस.बी. चवले, प्रा. एस.एस. नूर, प्रा. ए.एम. चौबे, प्रा. एस.एस. गड्डमवार, प्रा. पी.आर. इंगोले, प्रा. व्ही.व्ही. भोयर, प्रा. एस.एस. पेंटे, प्रा. के.बी. साळवे, प्रा. एस.जे. कदम, प्रा. ए.आर. भगत, प्रा. एस.सी. जिरापुरे, प्रा. ए.जी. पडगेलवार, प्रा. ए.एन. माहुरे, प्रा. एस.एस. मोघे, प्रा. भूपेंद्र गजभिये, विद्यार्थी प्रतिनिधी अभिलाष कांबळे आदींनी सहकार्य केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)