रोहीची शिकार करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:28 IST2018-09-18T22:26:36+5:302018-09-18T22:28:31+5:30
तालुक्यातील मनोहरनगर बोरी जंगलामध्ये रोह्याची शिकार करून १२० किलो मांस विक्रीसाठी शहरात आणताना टोळीला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री केली.

रोहीची शिकार करणारी टोळी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील मनोहरनगर बोरी जंगलामध्ये रोह्याची शिकार करून १२० किलो मांस विक्रीसाठी शहरात आणताना टोळीला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री केली.
इम्तियाज खान सरदार खान रा.अरुण ले-आऊट, मो. शोएब इकबाल अमीन (२६) रा.खडसे मैदान, सै. साकीब सै. अब्बास (२६) रा.लोहारा लाईन पुसद असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. एलसीबीचे फौजदार नीलेश शेळके यांना वन्य प्राण्यांच्या शिकार करणाऱ्या टोळीची गोपनीय माहिती मिळाली. ही टोळी एम.एच.२९/सी-९३३ क्रमांकाच्या कारने मांस घेऊन येत असताना त्यांना पुसद शहरातील इंदिरानगर येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याजवळून पोत्यात असलेले १२० किलो मांस, १२ बोर डबल बॅरल शॉटगन, काडतुसाच्या दोन पितळी केस, कुºहाड, सुरा असे एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात फौजदार नीलेश शेळके, साहेबराव राठोड, गोपाल वॉस्टर, सैयद साजिद, मुन्ना आडे, हरिश राऊत, प्रशांत हेडाऊ, विवेक पेठे यांनी केली.