शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खडक्यात भरदिवसा बंदूक रोखून पेट्रोल पंपावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

खडका येथे नव्यानेच किसनराव देशमुख यांचे दत्ता पेट्रोलियम सुरू झाले आहे. या पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी तीन युवक बंदूक घेऊन आले. त्यांनी आपल्या वाहनात पेट्रोलही भरुन घेतले; मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना पैशाची मागणी केली असता त्याला बंदूकचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर हे दरोडेखोर आपल्या वाहनाने पसार झाले. सदर बॅगमध्ये ५० हजार रुपयांची रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांच्या निशाण्यावर आलेल्या महागाव तालुक्यात मंगळवारी भरदुपारी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. बंदूकधारी दरोडेखोरांनी पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास तालुक्यातील खडका येथे घडली. खडका येथे नव्यानेच किसनराव देशमुख यांचे दत्ता पेट्रोलियम सुरू झाले आहे. या पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी तीन युवक बंदूक घेऊन आले. त्यांनी आपल्या वाहनात पेट्रोलही भरुन घेतले; मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना पैशाची मागणी केली असता त्याला बंदूकचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर हे दरोडेखोर आपल्या वाहनाने पसार झाले. सदर बॅगमध्ये ५० हजार रुपयांची रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी नाकाबंदी सुरू केली आहे. दरोडा टाकून पळालेले आरोपी महागाव शहराच्या दिशेने पसार झाल्याचे सांगितले जात आहे. महागाव शहरात आणि तालुक्यात गेल्या वर्षभरापासून धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. महागाव शहरातून गेेलेल्या महामार्गावरील चक्क एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेल्याची घटना ताजी असताना पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने खळबळ उडाली. 

खेड्यात देशीकट्टे पोहोचल्याने चिंता- शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडे अग्नीशस्त्र सापडत होते. आता हे अग्नीशस्त्र ग्रामीण भागातही सर्रास वापरले जात आहे. जिल्ह्यात परप्रांतातूनच देशीकट्टा आयात केला जातो. राऊंडही मिळविले जातात. २५ ते ३० हजारात सहज हे शस्त्र उपलब्ध होत आहे. यामुळे पोलिसांचे टेंशन वाढले आहे. छोट्या, मोठ्या गुन्ह्यात निघणारे शस्त्र आले कोठून याच्या मुळापर्यंत आजतागायत पोलीस पोहोचलेले नाही. 

जागोजागी नाकाबंदी- या प्रकरणात पेट्रोल पंपाचे मालक किसनराव देशमुख यांनी महागाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चोरटे महागाव शहराच्या दिशेने पळाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी जागोजागी नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे.

व्यापाऱ्यांमध्ये पसरले दहशतीचे वातावरण - भरदिवसा व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटना तालुक्यात वाढत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी व्यक्त केले. लुटमार वाढत असताना एकाही दरोडेखोराला तत्काळ अटक झाल्याचे दिसत नाही. व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटण्याआधीच पोलिसांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.  

 

टॅग्स :RobberyचोरीPetrol Pumpपेट्रोल पंप