उमरखेडमधील रोडरोमिओंना आवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:29 IST2017-12-30T22:28:55+5:302017-12-30T22:29:07+5:30
शहरातील शाळा महाविद्यालय आणि शिकवणी परिसरात मुलींची छेड काढण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिलांसह मुलीही त्रस्त झाल्या आहे. या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीने .....

उमरखेडमधील रोडरोमिओंना आवरा
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरातील शाळा महाविद्यालय आणि शिकवणी परिसरात मुलींची छेड काढण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिलांसह मुलीही त्रस्त झाल्या आहे. या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उमरखेड शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. येथे छोटी घटनाही उग्ररूप धारण करू शकते. अशातच अलिकडे शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना त्रास देण्याचा प्रकार वाढला आहे. शाळा महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग, गर्दीच्या ठिकाणी छेड काढली जाते. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडी प्रमुख मनीषा काळेश्वरकर, योगिनी पांडे, अलका मुडे यांच्यासह अनेक महिलांनी दिला आहे. सदर निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांना दिले.