रस्ता झाला मोकळा
By Admin | Updated: June 16, 2016 02:53 IST2016-06-16T02:53:29+5:302016-06-16T02:53:29+5:30
तालुक्यातील सोनापूर येथील १०० वर्षे जुना असलेला रस्ता अखेर महसूल विभागाने अतिक्रमणातून मोकळा करून दिला.

रस्ता झाला मोकळा
वणी : तालुक्यातील सोनापूर येथील १०० वर्षे जुना असलेला रस्ता अखेर महसूल विभागाने अतिक्रमणातून मोकळा करून दिला.
रेकॉर्डवर व वहितीत असलेला रस्ता बंद करण्याकरिता २०१४ मध्ये तलाठी राजहंस वरठे यांनी खोटा अहवाल सादर करून तत्कालीन नायब तहसीलदार देवराव आसुटकर यांच्याकडे दिला. त्यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन रेकॉर्डचा रस्ता बंद करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरूद्ध मधुकर देठे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले होते. त्यानंतर एक वर्ष उपविभागीय कार्यालयातर्फे चौकशी सुरू होती. गेल्या २१ नोव्हेंबर २०१५ ला उपविभागीय अधिकाऱ्यांनी देवराव आसुटकर यांचे आदेश रद्द करून रेकॉर्डच्या बाजूने निर्णय दिला. नंतर रमेश खाडे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल सादर केले होते. ते खारीज करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २२ एप्रिल २०१६ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला व रेकॉर्डचा रस्ता मोकळा करण्याचा मार्ग सुकर केला. नंतर नायब तहसीलदार एस.आर. शेख, मंडळ अधिकारी जयंत झाडे, ज.जी. राजगुरे, कुमाड, तलाठी सी.एम. मडावी यांनी मोजमाप करून २१ फुटांचा हा रस्ता मोकळा करून दिल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याची सुविधा झाली. (कार्यालय प्रतिनिधी)