सावळी रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:07+5:30
रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे. आर्णी ही बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने याच रस्त्याने सावळीसदोबा परिसरातील जनतेला दररोज येथे यावे लागते.

सावळी रस्त्याची चाळणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : आर्णी ते सावळीसदोबा रसतयाची पूर्णत: चाळणी झाली आहे. रस्त ठिकठिकाणी उखडल्याने अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे.
येथून सावळीसदोबाकडे जाताना प्रवाशांना दररोज जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हा रस्ता तयार करण्यात आला, तेव्हापासूनच उखडण्यास सुरूवात झाली. विशेष म्हणजे या रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे.
आर्णी ही बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने याच रस्त्याने सावळीसदोबा परिसरातील जनतेला दररोज येथे यावे लागते. दररोज शेकडो नागरिक व विद्यार्थी दररोज या रस्त्याने ये-जा करतात. एसटी बस, अवैध प्रवासी वाहतूक वाहनेही याच रस्त्याने धावतात. मात्र रस्त्या पूर्णत: उखडल्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होत आहे. वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने होणारी रेती वाहतूक बंद करण्याची मागणी १५ गावांतील नागरिकांकडून होत आहे.
नवीन रस्ता तयार करावा
आर्णी ते सावळीसदोबा रस्त्याने रेतीची वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्ता उखडला. आता नवीन रस्ता तयार करून द्यावा किंवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. या रस्त्यावर जवळपास १५ गावे येतात. या गावांतील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे.