दोन खाणींच्या मधातून जाणारा रस्ता धोकादायक

By Admin | Updated: February 11, 2015 00:11 IST2015-02-11T00:11:24+5:302015-02-11T00:11:24+5:30

निलजई कोळसा खाण क्रमांक १ व २ च्या मधातून जाणारा घुग्गुस-चंद्रपूर मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे़ हा दोन्ही खाणींच्या मधातून जात असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

The road going through the mines of two mines is dangerous | दोन खाणींच्या मधातून जाणारा रस्ता धोकादायक

दोन खाणींच्या मधातून जाणारा रस्ता धोकादायक

उकणी : निलजई कोळसा खाण क्रमांक १ व २ च्या मधातून जाणारा घुग्गुस-चंद्रपूर मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे़ हा दोन्ही खाणींच्या मधातून जात असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
हा रस्ता बंद करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले होते़ परंतु पर्यायी रस्ता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत याच मार्गाने प्रवाशांना जावे लागत आहे़ दुसरा मार्ग जोपर्यंत पूर्ण होऊन डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत हा मार्ग बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी परिसरातील तरोडा, निलजई, निवली, लाठी येथील सरपंचांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती़ हा रस्ता दोन्ही खाणींच्या मधातून जातो. या खाणींचे खोदकाम सुरू आहे. ते रत्स्याच्या अत्यंत जवळ आले आहे. या खाणींमध्ये पहिलेच उच्चदाब स्फोटाची ब्लास्टिंग नेहमी केली जाते. या ब्लॉस्टिंगमुळे नेहमी हादरे बसतात. ब्लॉस्टिंगचा हादरा बसून रस्त्याचेही नुकसान होऊ शकते. सोबतच मानवी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ज्यावेळी कोळसा खाणीत ब्लॉस्टिंग सुरू असते, त्यावेळी तेथून एगादी वाहन जात असताना त्यावर दगड आदळले, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तत्काळ करून देण्याची गामणी आहे़ (वार्ताहर)

Web Title: The road going through the mines of two mines is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.