आर्णीत कर्जमाफीसाठी सेनेचा रास्तारोको

By Admin | Updated: March 19, 2017 01:26 IST2017-03-19T01:26:16+5:302017-03-19T01:26:16+5:30

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेने शुक्रवारी येथे रास्तारोको केला. यवतमाळ मार्गावरील गणपती मंदिराजवळ करण्यात आलेल्या

Road to the debt waiver | आर्णीत कर्जमाफीसाठी सेनेचा रास्तारोको

आर्णीत कर्जमाफीसाठी सेनेचा रास्तारोको

अर्णी : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेने शुक्रवारी येथे रास्तारोको केला. यवतमाळ मार्गावरील गणपती मंदिराजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजुंकडील वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार सुधीर पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य श्रीकांत राठोड, पंचायत समिती सदस्य अनुप जाधव, बाजार समितीचे माजी सभापती जीवन जाधव, राहुल लाभसेटवार, फैयाज सैयद, रामेश्वर जाधव, उत्तम राठोड, गुड्डु देठे, नीलेश गावंडे, गजानन कोळेकर, विक्की गालचेलवार, दिलीप नागापुरे, कनिष्क भालेराव आदी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Road to the debt waiver