शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

पावसाविना सहा लाख हेक्टर पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 9:43 PM

निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ १९.२४ टक्के पाणी शिल्लक : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३ टक्केच पाऊस

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४०२ गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम आहे. या गावांतील एक लाख नागरिकांपुढे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.मान्सून सक्रीय नसून बंगालच्या खाडीतून येणाऱ्या मोसमी वाºयाचा पाऊस जिल्ह्यात आला आहे. काही भागात हा पाऊस बरसला तर काही भागात अपुरा बरसला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १३.९३ टक्के आहे. अपुºया पावसाने प्रकल्पही भरले नाही. जिल्ह्यातील २५० पाझर तलाव आणि लघुप्रकल्प कोरडे आहेत. इतर प्रकल्पांमध्येही अपुरा जलसाठा आहे.साधारणत: जुलैत सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा अर्धा जुलै संपूनही पाऊस १२ दिवसांपासून गायब आहे. यामुळे प्रकल्पातील साठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. मोठ्या पूस प्रकल्पात सर्वाधिक २१.५८ टक्के पाणी आहे. अरुणावतीमध्ये ९.६४ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्प २८ टक्के भरलेला आहे. इसापूर धरणात अत्यल्प पाणी आहे. चार मोठ्या प्रकल्पात सरारी २०.३७ टक्के पाणी आहे. मध्यम ९ प्रकल्पात १६.८९ टक्के तर ९४ लघु प्रकल्पात १९.४९ टक्के पाणी शिल्लक आहे. ४०२ विहिरी अधिग्रहित करूनही एक लाख पाच हजार नागरिकांची तहान टँकरवरच अवलंबून आहे.खरीपातील अडचणी वाढल्याजिल्ह्यात केवळ १२६ मिमी पाऊस बरसला. आता खरिपाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. विहिरींची पातळीही वाढली नाही. यामुळे ओलिताच्या शेतीचीही अवस्था कोरडवाहूसारखी झाली आहे. सहा लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न आल्यास हे पीक कोमेजणार आहे.उमरखेड, दिग्रस, पुसदला फटकाजिल्ह्यातील ४०२ गावामध्ये अजूनही पाणीटंचाई आहे. यात वणी तालुक्यातील १२ गावे, दारव्हा ४२, पुसद ४३, नेर २५, यवतमाळ २७, बाभूळगाव ९, आर्णी ४५, दिग्रस ५४, महागाव १५, केळापूर ३, झरी ४, घाटंजी ४१, राळेगाव ३, कळंब १६, उमरखेड तालुक्यातील ६३ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती