वाढत्या वाहन चोरीला ‘अ‍ॅन्टी थेफ्ट डिव्हाईस’चा चाप

By Admin | Updated: September 9, 2014 00:39 IST2014-09-09T00:39:48+5:302014-09-09T00:39:48+5:30

वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहनमालक नव्हे तर पोलिसही बेजार झाले आहेत. एकतर चोरटा सापडतो तर कबुली देत नाही. कबुली दिली तर वाहन सुस्थितीत हाती लागत नाही. इकडे चोरीच्या घटनांचा वाढता

The rising antagonist of the vehicle 'Anti-Theft Devices' | वाढत्या वाहन चोरीला ‘अ‍ॅन्टी थेफ्ट डिव्हाईस’चा चाप

वाढत्या वाहन चोरीला ‘अ‍ॅन्टी थेफ्ट डिव्हाईस’चा चाप

अखिलेश अग्रवाल - पुसद
वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहनमालक नव्हे तर पोलिसही बेजार झाले आहेत. एकतर चोरटा सापडतो तर कबुली देत नाही. कबुली दिली तर वाहन सुस्थितीत हाती लागत नाही. इकडे चोरीच्या घटनांचा वाढता आलेख त्यावर वरिष्ठांकडून कान उघडणी अशी पोलिसांची स्थिती. परंतु आता एका संशोधकाने पोलिसांची डोकेदुखी थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्याने ‘एण्टी थेफ्ट डिव्हाईस’ विकसित केले आहे. हे डिव्हाईस लावल्यानंतर वाहन चोऱ्या थांबतील असा विश्वास आहे. पुसद येथील अजय विश्वकर्मा असे त्या संशोधकाचे नाव आहे.
एण्टी थेफ्ट डिवाईस जीएसएम सिस्टीमवर आधारित तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या वाहनांकरिता उपयोगी आहे. विशेष म्हणजे याला वापरण्यासाठी वाहनातील बॅटरीची गरज पडत नाही. सदर उपकरणातच इनबिल्ट बॅटरी चार्जिंग सर्किट बसविण्यात आले आहे. खास बाब म्हणजे हे उपकरण बाईक, कार किंवा अन्य कोणत्याही वाहनात अशाप्रकारे बसविण्याची व्यवस्था केलेली आहे की त्याचा केबलचा शोध घेणे मॅकेनिकलाही शक्य होणार नाही. मोबाईलमार्फत विशिष्ट क्रमांक डायल करून वाहन सुरू किंवा बंद करू शकतो. जेव्हापर्यंत वाहनचालक त्यांच्या मोबाईलमधून विशिष्ट क्रमांक किंवा नेम (नाव) की (बटन) डायल करून आॅन करणार नाही, तोवर वाहन संचालित होणार नाही. एखाद्या चोराने वाहन चोरी केल्यानंतर चोरी झाल्याचे कळाले तरी काही हरकत नाही. मोबाईलने गाडीचे इग्नीशन लगेच बंद करता येईल व मग ते वाहन चालू होणार नाही आणि जीएसएम सिस्टीमुळे त्या वाहनाचे लोकेशन पण डिटेक्ट करता येईल, असे त्याने सांगितले. इंजिनियरिंगमध्ये पदविकाधार अजयचे आंबेडकर चौकात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे.
यापूर्वी २००७ मधे मोबाईल, टॅबलेटस, लॅपटॉप, कॅमेरा, नोटबुकसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटसला पाण्यापासून सुरक्षा प्रदान करणारे वाटर रेजिस्टेंस सोल्युशनचे संशोधन अजय विश्वकर्मा यांनी केले होते. त्यांचे पेटेंट फायलिंग झालेले आहे.

Web Title: The rising antagonist of the vehicle 'Anti-Theft Devices'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.