सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविले

By Admin | Updated: July 30, 2014 00:04 IST2014-07-30T00:04:02+5:302014-07-30T00:04:02+5:30

बैद्यनाथ समितच्या शिफारशीनुसार पुनर्गठन आणि २५ टक्के वसुलीत मागे असलेल्या तालुक्यातील २८ सोसायट्यांपैकी सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आले. तर २१ सोसायट्यांचे

The right to lend money to seven societies was frozen | सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविले

सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविले

महागाव : बैद्यनाथ समितच्या शिफारशीनुसार पुनर्गठन आणि २५ टक्के वसुलीत मागे असलेल्या तालुक्यातील २८ सोसायट्यांपैकी सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आले. तर २१ सोसायट्यांचे कामकाज कसेतरी संजीवनीवर सुरू आहे.
तालुक्यातील सवना, मुडाणा, फुलसावंगी, साई हिवरा, पोहंडुळ, आणि शिरपूर सोसायटीचा समावेश आहे. यापैकी मुडाणा सोसायटीच्या ६० सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले. अपात्र असलेल्या सोसायट्यांचे कर्ज मागणी करणारे शेतकरी बँकेकडे अद्यापही फिरकले नाही. या सात सोसायटीतल सभासदांना बँकेमार्फत थेट कर्ज वाटप करण्यात येणार आहे. सोसायट्यांची वसली तर नाही. काही सोसायट्याने एका सभासदाला दोन दोन ठिकाणावरून कर्जपुरवठा केला आहे. सात सोसायट्यांचे कर्ज वाटपाचे अधिकार गोठविण्यात आल्याने बराच गोंधळ बाहेर येऊ लागला आहे. नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने सहकार विभाग नेमला आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे विभागून दिली गेली. परंतु तालुक्यातील सोसायट्या आणि सहकार विभागाच्या संस्थांची स्थिती पाहिली तर सहकार विभाग पांढरा हत्ती झाल्याचे दिसत आहे. तालुक्यातील सहकार विभागाने ज्या संस्थेला मार्गदर्शन आणि पतपुरवठा करुन देण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे, अशा सर्व संस्थांचे अवसान गळून पडले. ज्या सोसायट्यांची वसुली शून्यावर आली आहे. संस्थांमधील अनागोंदी, गैरव्यवहार शोधून काढणे, त्यांना मार्गदर्शन करणे त्यांची आर्थिक सुबत्ता आणण्यास मदत मार्गदर्शन करणे हे काम सहकार विभागाचे आहे. अपवाद वगळता बहुतांश संस्था डबघाईस आल्या. काही संस्थेने गैरव्यवहाराचे विक्रम मोडले तरी अशा काही संस्थेमधील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार शोधून काढला नाही.
जिल्हा बँकेनेच वसुलीत माघारलेल्या संस्थेवर कार्यवाही केली आहे. संस्थेने अधिकार गोठविणे त्याचाच एक भाग असून बँकेने आपल्या अधिकारात कार्यवाही केली आहे. परंतु सहकार विभागाचे वरातीमागून घोडे सुरूच आहेत. सोसायट्यातील अनागोंदी सर्वांच्या नाकासमोर आहे. कार्यवाही मात्र होताना दिसत नाही. सहकारात गोतावळ्यातील माणसं गुंतलेली असल्यामुळे कोणावर कार्यवाही करावी, असा सवाल बँकेलासुद्धा पडत आहे. कर्जवाटप आणि वसुली आॅलवेल असताना कार्यवाही शून्य आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The right to lend money to seven societies was frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.