मारवाडी घाटात भरधाव इंडिका दरीत कोसळली

By Admin | Updated: September 2, 2015 04:03 IST2015-09-02T04:03:11+5:302015-09-02T04:03:11+5:30

चालकाचे नियंत्रण गेल्याने भरधाव कार दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना मारवाडी घाटात रविवारी उघडकीस

Riding in Marwadi Ghat, Indica fell in the valley | मारवाडी घाटात भरधाव इंडिका दरीत कोसळली

मारवाडी घाटात भरधाव इंडिका दरीत कोसळली

पुसद : चालकाचे नियंत्रण गेल्याने भरधाव कार दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना मारवाडी घाटात रविवारी उघडकीस आली. कारने पाच ते सहा पलट्या खाऊनही सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.
पुसद ते वाशिम मार्गावरील मारवाडी घाटातील कैलास टेकडी जवळील वळणावर इंडिका कार एमएच ३८-४४१४ च्या चालकाचे नियंत्रण गेले. भरधाव कार पाच ते सहा पलट्या घेत २५ ते ३० फुट खोल दरीत कोसळली.
गाडीमध्ये चालक एकटाच असल्याने त्याने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेतल्याने सुदैवान जिवीत हाणी टळली. ही कार नेमकी कुणाची आहे हे मात्र कळू शकले नाही. मात्र समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष असे या कारच्या मागच्या बाजूला लिहिलेले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Riding in Marwadi Ghat, Indica fell in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.