पाचवीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम
By Admin | Updated: April 29, 2015 02:27 IST2015-04-29T02:27:55+5:302015-04-29T02:27:55+5:30
शिक्षण विभागाने इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात फेरबदल केला आहे. २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पाचवीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम
घाटंजी : शिक्षण विभागाने इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात फेरबदल केला आहे. २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. घाटंजी तालुक्यातील १५५ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
घाटंजीतील एसपीएम विद्यालय आणि गिलाणी महाविद्यालय येथे पुनररचित अभ्यासक्रमाचे व्हर्च्युअल पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे. २७ ते ३ मे दरम्यान सकाळी १० ते ५ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित आहे. या प्रशिक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, विस्तार अधिकारी संध्या गगंमवार, जी.ए. बेलखेडे, सर्व केंद्र प्रमुख, विषयतज्ज्ञ, श्रीकांत पायताडे, मानव लढे, आकाश कवासे, तांत्रिक मार्गदर्शक अरविंद मानकर यांनी पुढाकार घेतला.
नवीन अभ्यासक्रम असल्याने गुरुजींचीच शाळा सुरू आहे. ३ मेपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गाला बऱ्याच शिक्षकांकडून अर्ध्यातच दांडी मारली जाते. नव्या अभ्यासक्रमाबाबत उत्सुकता असलेलाही शिक्षक वर्ग येथे आहे. त्यातील सोप्या व सुलभ अध्ययन पद्धतीत मार्गदर्शकाकडून समजावून घेत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)