समता पर्वाच्या तयारीचा आढावा

By Admin | Updated: March 23, 2015 00:05 IST2015-03-23T00:05:32+5:302015-03-23T00:05:32+5:30

सर्व जाती-धर्मातील समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांची पेरणी करण्याच्या हेतुने १० वर्षांपूर्वी अत्यंत धुमधडक्यात सुरू करण्यात आलेले ‘समता पर्व’

Review of parity preparation | समता पर्वाच्या तयारीचा आढावा

समता पर्वाच्या तयारीचा आढावा

यवतमाळ : सर्व जाती-धर्मातील समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांची पेरणी करण्याच्या हेतुने १० वर्षांपूर्वी अत्यंत धुमधडक्यात सुरू करण्यात आलेले ‘समता पर्व’ गतवर्षीप्रमाणे या वर्षीही महिलांकडे सोपविण्यात आले आहे.
येथील समता मैदानात ६ ते १४ एप्रिल या दरम्यान हे पर्व होणार असून, प्रारंभीचे तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आयडॉल सोबतच स्पर्धा परीक्षा, एक क्षण गौरवाचा, प्रश्न मंजुषा, समयस्फू र्त भाषण स्पर्धा, कविसम्मेलन आणि विविध प्रबोधनपर व्याख्यानाची मेजवाणी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे.
‘समता पर्व’ आयोजन समितीची दुसरी बैठक मंगळवारी सायंकाळी लॉर्ड बुद्धा वाहिनी कार्यालयात झाली. उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनात दीपक वाघ, सुनीता काळे, बाळकृष्ण सरकटे, नारायण स्थुल, सुनंदा वालदे, संजय बोरकर, मंन्सुर एजाज जोश, ज्ञानेश्वर गोबरे, बळी खैरे, सुभाष कुळसंगे आदींनी उपयुक्त सूचना केल्या.
यावेळी वेगवेगळ््या समित्यांची स्थापना करून कामाची विभागणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वक्ते आणि विषयांची निवड करण्याबरोबरच उद्घाटक आणि समारोपीय कार्यक्रमांसाठी पाहुण्यांची निवड सुरू झाली आहे. कार्यक्रमांचा दर्जा टिकविण्याची सूचना सर्वच उपस्थितांनी यावेळी केली.
बैठकीला मंगला दिघाडे, राखी भगत, मायाताई गोबरे, उज्वला इंगळे, स्मिता उके, मधुकर भैसारे, किशोर भगत, दीपक नगराळे, अविश बन्सोड, कवडू नगराळे, अंकुश वाकडे आदी उपस्थित होते. दरम्यान २३ मार्चपासून यवतमाळ आयडॉलची आॅडिशन सुरू होणार असून, याच सहभागाची विनंती केली आहे. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

Web Title: Review of parity preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.