विधिमंडळ अंदाज समितीने घेतला समस्यांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:42 IST2018-10-13T23:41:31+5:302018-10-13T23:42:53+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी झरी व वणी तालुक्यातील उद्योगांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेतला.

विधिमंडळ अंदाज समितीने घेतला समस्यांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी झरी व वणी तालुक्यातील उद्योगांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेतला.
समिती प्रमुख आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वात आ.उन्मेश पाटील, आ.बुंदीले, आ.चव्हाण यांच्यासह शासनाच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांनी दुपारी झरी तालुक्यातील टॉपवर्थ कोल कंपनी, इशान मिनरल या उद्योगांना भेटी देऊन या उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाचा आढावा घेतला. प्रदूषणावर काय उपाययोजना करता, याची विचारणा या समितीने उद्योगाच्या प्रशासनाला केली. तसेच काही शेतकऱ्यांशी संवाददेखिल साधला. त्यानंतर ही समिती वणी तालुक्यातील भालरकडे रवाना झाली.
सायंकाळी या समितीने वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या समितीसोबत यवतमाळ येथील महसूल विभागाचे अधिकारी, तसेच पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा, बांधकाम विभागाचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य आशिष खुलसंगे उपस्थित होते.