घाटंजीत परतीच्या पावसाचा कहर

By Admin | Updated: October 9, 2016 00:15 IST2016-10-09T00:15:15+5:302016-10-09T00:15:15+5:30

परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले.

Return to ghatanjit rains | घाटंजीत परतीच्या पावसाचा कहर

घाटंजीत परतीच्या पावसाचा कहर

५०० हेक्टरचे नुकसान : सोयाबीन, कापूस, तुर आडवी
यवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. या मागणीसाठी पाच गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यासह जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
सततच्या पावसाने संपूर्ण जिल्हातील पीक धोक्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटंजी तालुक्यात पावसाचा कहर झाला. पारवा सर्कलमध्ये याचा फटका बसला. अचानक आलेल्या वादळी पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. याचा फटका मंगी, सगदा, भिमकुंड, सावंगी आणि ठाणेगावला बसला.
कापूस, सोयाबीन, तुर हे पीक या पावसात आडवे झाले. कपाशीचे बोंड गळाले. तर सोयाबीनचे झाड जमीनदोस्त झाले. तुरीच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. ५०० हेक्टरवर लाखोचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि जिल्हा प्रशासनकाडे निवेदन सादर केले. यावेळी घाटंजीचे माजी सभापती रूपेश कल्यमवार, सावंगीचे सरपंच अजय रेड्डी येल्टीवार, किरण कुमरे, पोचारेड्डी जिड्डेवार, गंगया बदीवार, चिनया जडगिलवार, शाम पेंटावार, अनिल मोहूर्ले, गंगया आकमवार यांच्यासह अनेकजन उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Return to ghatanjit rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.