सेवानिवृत्त शिक्षकांना मरणाआधी निवडश्रेणीचा लाभ मिळावा
By Admin | Updated: September 10, 2016 00:57 IST2016-09-10T00:57:21+5:302016-09-10T00:57:21+5:30
सेवानिवृत्त शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी देण्याचा शासन निर्णय झाला आहे. परंतु अद्यापही शेकडो जणांना निवडश्रेणीच्या यादीत स्थान मिळाले नाही.

सेवानिवृत्त शिक्षकांना मरणाआधी निवडश्रेणीचा लाभ मिळावा
संतप्त शिक्षक : कासवगतीने काम सुरू असल्याने होत आहे विलंब
दारव्हा : सेवानिवृत्त शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी देण्याचा शासन निर्णय झाला आहे. परंतु अद्यापही शेकडो जणांना निवडश्रेणीच्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे मारणाआधी तरी निवडश्रेणीचा लाभ मिळेल काय, असा संतप्त सवाल करण्यात येत आहे.
या संदर्भातील पहिली यादी १ मे २००९ ला प्रसिद्ध झाली. परंतु कासवगतीने कामकाज सुरू असल्यामुळे ५०० ते ७०० सेवानिवृत्त निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. चट्टोपाध्याय आयोगानुसार जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना त्रीस्तरीय वेतन श्रेणी देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आल्यानंतर निवड श्रेणीची यादी तयार करण्याच्या कामाला शिक्षण विभागाने सुरूवात केली. १ मे २००९ ला पहिली यादी प्रसिद्ध झाली. परंतु अजूनही ५०० ते ७०० जण या लाभापासून वंचित आहे. यातील बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. तरीही त्यांना निवडश्रेणीचा लाभ मिळाला नाही. आतापर्यंत अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी बदलून गेले. परंतु हा विषय कुणीही गांभिर्याने घेतला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवृत्त विभागाचे लिपीक यादी तयार करतात परंतु अधिकारी वर्गाकडून फाईल पुढे सरकविल्या जात नाही. नवीन नवीन त्रृट्या काढून ब्रेक लावण्यात येत असल्याचे सेवानिवृत्त शिक्षकांकडून सांगितले जात आहे. शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, निवृत्त विभागाचे लिपिक व सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून तात्काळ निर्णय घेऊन मरणाआधी निवडश्रेणीचा लाभ घ्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाचशे शिक्षक वंचित
पहिली यादी १ मे २००९ लाच प्रसिद्ध झाली. परंतु कासवगतीने कामकाज सुरू असल्याने पाचशे ते सातशे सेवानिवृत्त शिक्षक निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अधिकारी वर्गाकडून फाईलच पुढे सरकविली जात नसल्याचाही आरोप आहे.