ंघाटंजी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.११ टक्के

By Admin | Updated: May 28, 2015 01:55 IST2015-05-28T01:55:38+5:302015-05-28T01:55:38+5:30

तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी बसलेल्या १ हजार ४९६ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.११ टक्के निकाल लागला ....

The results of Hathwani taluka-HSC resulted by 9.11 percent | ंघाटंजी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.११ टक्के

ंघाटंजी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.११ टक्के

घाटंजी : तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी बसलेल्या १ हजार ४९६ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.११ टक्के निकाल लागला तर १०५ विद्यार्थ्यांनी पुनर्रपरीक्षा दिली. त्या ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा ६०.९५ टक्के निकाल लागला. या दोन्ही परीक्षार्थीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.०१ इतकी आहे.
यात श्री समर्थ क. महाविद्याल घाटंजी, स्व. किशनसिंग सिद्धु क. महाविद्यालय राजुरवाडी, संत गाडगे बाबा क. महाविद्यालय चिखलवर्धा व पोस्ट बेसिक आश्रमशाळा जाम यांचा परीक्षेचा निकाल (नियमित विद्यार्थी) शंभर टक्के लागला. तसेच एस.पी.एम. उच्च माध्य. विद्यालय घाटंजी ९७.९ टक्के, एस.पी.एम. गिलाणी आर्ट, कॉमर्स कॉलेज घाटंजी ८८.५२ टक्के, बा.दे. ज्यु. उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ९६.४५, विवेकानंद क. महा. विद्यालय पांढुर्णा ९० टक्के, कै. मंजी नाईक क. महाविद्यालय किन्ही ९८ टक्के, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी क. महाविद्यालय घोटी ९८.६३ टक्के, प्रेमसिंग राठोड उच्च माध्यमिक विद्यालय मोवाडा ९४.८७ टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ९९.०८ टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय कुर्ल ९३.३३ टक्के, शिवरामजी मोघे क. महाविद्यालय पार्डी ९६.९७ टक्के, जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा खापरी ९२.१३, संत गजानन महाराज क. महाविद्यालय सावरगाव ८० टक्के, संत गजानन महाराज क. महाविद्यालय कोळी ९५.२४ टक्के, श्री स्वामी समर्थ क. महाविद्यालय शिवणी ९१.८९ टक्के, शंकरराव पाटील निकडे क. महाविद्यालय पार्डी ९२.८६ टक्के, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय ताडसावळी ९० टक्के, शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय घाटी घाटंजी ९१.३० टक्के, ए.एन. पटेल उर्दू क. महाविद्यालय चिखलवर्धा ८१.८२ टक्के निकाल लागला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The results of Hathwani taluka-HSC resulted by 9.11 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.