पुसदचा निकाल ८२.१४ टक्के

By Admin | Updated: May 31, 2017 00:29 IST2017-05-31T00:29:55+5:302017-05-31T00:29:55+5:30

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला

The result of pollution is 82.14 percent | पुसदचा निकाल ८२.१४ टक्के

पुसदचा निकाल ८२.१४ टक्के

बारावीची परीक्षा : महागाव ८९.०८ टक्के, दिग्रस ९३.५१ टक्के, उमरखेड तालुक्याचा ९३.०७ टक्के निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला असून पुसद तालुक्याचा निकाल ८२.१४ टक्के लागला आहे. यंदा चार हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेंमध्ये विद्यार्थ्यांची एकच झुंबड झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घसरली आहे.
येथील को.दौ. विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी मधुकर फाळके हिने विज्ञान शाखेत ९०.६१ टक्के गुण प्राप्त केले आहे. ती तालुक्यातून अव्वल ठरली आहे. पुसद तालुक्यातील ३९ कनिष्ठ महाविद्यालयातील चार हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी चार हजार १९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तीन हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुसद येथील लोकहित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला. वसंतराव कनिष्ठ महाविद्यालय ७० टक्के, फुलसिंग नाईक कनिष्ठ महाविद्यालय ८७ टक्के, के.डी. महाविद्यालय ९१ टक्के, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय ८९ टक्के, गुलामनबी आझाद उर्दू कन्या ज्युनिअर कॉलेज ९२ टक्के, महिला महाविद्यालय ८४ टक्के, गुणवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय ९४ टक्के, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बेलोरा ७१.९५ टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज जांबबाजार ८७.७५ टक्के, रामू नाईक ज्युनिअर कॉलेज वरूड ७७.६५ टक्के, बा.ना. ज्युनिअर कॉलेज पारवा ५५.८४ टक्के, अब्दुल रसिद ज्युनिअर कॉलेज शेंबाळपिंपरी ७० टक्के, नामदेव मळघने आदिवासी आश्रमशाळा मरसूळ ९४.७० टक्के, यशवंत ज्युनिअर कॉलेज शेंबाळपिंपरी ६६.६६ टक्के, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज अडगाव ९६ टक्के, सुधाकर नाईक ज्युनिअर कॉलेज रोहडा ७४ टक्के, संभाजी पांडे ज्युनिअर कॉलेज सांडवा ६६.२३ टक्के, शिवाजीराव मोघे ज्युनिअर कॉलेज हर्षी ८१.८१ टक्के, वसंतराव पुरके ज्युनिअर कॉलेज बोरगडी ८०.१२ टक्के, उच्च माध्यमिक विद्यालय काटखेडा ७७ टक्के, सुधाकर नाईक माध्यमिक विद्यालय जनुना ५९.४९ टक्के, संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज लाखी ७७.७७ टक्के, वसंतराव नाईक व्हीजेएनटी आश्रमशाळा चिखली कॅम्प ९१ टक्के, सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज खडकदरी ५५.२६ टक्के, व्हीजेएनटी उच्च माध्यमिक आश्रमशाळा सावरगाव बंगला ७३.२९ टक्के, शासकीय आश्रमशाळा हर्षी ८१.२५ टक्के, विश्वनाथसिंह बयास हायस्कूल पुसद ८६.५९ टक्के, उच्च माध्यमिक विद्यालय घाटोडी ६२.६८ टक्के, जेएसपीएम उच्च माध्यमिक विद्यालय पुसद ७० टक्के, जेएसपीएम उच्च माध्यमिक विद्यालय बान्सी ६१.९५ टक्के निकाल लागला. मंगळवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच शहरातील विविध सायबर कॅफेंवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी दिसून आली, तर काही विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल बघितला.

कला शाखेत महागावात रेखा देवकर अव्वल
महागाव : महागाव तालुक्याचा बारावीचा निकाल ८९.०८ टक्के लागला आहे. या परीक्षेत तालुक्यातून २२१५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९७४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मुलांची टक्केवारी ८७.१० तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०२ टक्के आहे.बारावीच्या परीक्षेत येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेखा विश्वनाथ देवकर ही कला शाखेत ७५ टक्के गुण घेऊन अव्वल ठरली आहे. तर याच विद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजली शंकर चिंचोळकर ही विज्ञान शाखेतून ७२ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली. तालुक्यातील दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात सावित्रीबाई फुले विद्यालय महागाव आणि साईबाबा विद्यालय टेंभीचा समावेश आहे. वनमालाताई राठोड विद्यालय आमनी बु. ९९.०४ टक्के, शिवाजी विद्यालय सवना ९८.८२ टक्के, मातोश्री विद्यालय महागाव ९४.६४ टक्के, निजधाम आश्रमशाळा ८९.०६ टक्के, एचएससी शिक्षण संस्था हिवरा ८८.८८ टक्के, अतहर मिर्झा विद्यालय काळी ८७ टक्के, मारोतराव पाटील विद्यालय अंबोडा ८६.६६ टक्के, जनता शिक्षण प्रसारक मंडळ फुलसावंगी ८३.३३ टक्के, मनोहर नाईक विद्यालय गुंज ८९.६१ टक्के, शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविद्यालय फुलसावंगी ७८ टक्के निकाल लागला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.

उमरखेड तालुक्यात मुलींनी मारली बाजी
उमरखेड : बारावीच्या परीक्षेत उमरखेड तालुक्यातून २५११ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३३७ म्हणजे ९३.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींनी बाजी मारली असून यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०२ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.४४ आहे. तालुक्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणगाव, आर्ट अ‍ॅन्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज उमरखेड आणि कस्तुरबा गांधी ज्युनिअर कॉलेज ढाणकीचा समावेश आहे. तसेच शिवाजी विद्यालय पोफाळी ८३.७६, सम्यक दृष्टी ज्युनिअर कॉलेज मुळावा ९२ टक्के, वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज बिटरगाव ९५ टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज मुळावा ९५ टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज चातारी ८२ टक्के, पंचकृष्ण ज्युनिअर कॉलेज मुळावा ९६ टक्के, उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेज कुपटी ९६ टक्के, उर्दू ज्युनिअर कॉलेज उमरखेड ९७ टक्के निकाल लागला आहे.

 

Web Title: The result of pollution is 82.14 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.