जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के
By Admin | Updated: June 21, 2014 02:06 IST2014-06-21T02:06:09+5:302014-06-21T02:06:09+5:30
दहावीची परीक्षा : संस्थाध्यक्ष विजय दर्डांकडून शिक्षकांचे कौतुक

जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के
यवतमाळ : जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने दहावीच्या परीक्षेत आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेच्या मोहित विठ्ठलानी या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे. त्याने गणित, विज्ञान आणि संस्कृत या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे.
साक्षी केशट्टीवार ही विद्यार्थिनी शाळेतून दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून तिने तीन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. शाळेच्या या यशानिमित्त संस्थेचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देवून मुख्याध्यापिका मिनी थॉमस आणि शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. यावेळी संस्थेचे सचिव माजी आमदार कीर्ती गांधी, उपाध्यक्ष अरुणभाई पोबारू, शाळेचे संचालक किशोर दर्डा, सुधा राठी, महेंद्र ओसवाल, देवकिसन शर्मा, प्रकाशचंद छाजेड, अँग्लो हिंदी हायस्कूलचे प्राचार्य एम.एस. कश्यप, उपप्राचार्य आर. त्रिपाठी आदी उपस्थित होते. शाळेचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे विजय दर्डा यांनी कौतुक केले. शाळेचा १०० टक्के निकाल हे भारती वासानी, नितीन चौहान, केशट्टीवार, आशीष चमेडिया या शिक्षकांच्या परिश्रमाचे फलीत असल्याचे मिनी थॉमस यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)