विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

By Admin | Updated: May 17, 2014 23:53 IST2014-05-17T23:53:27+5:302014-05-17T23:53:27+5:30

जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रापैकी केवळ पुसद आणि उमरखेड येथील आमदारांनी आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यात यश मिळाले.

The result of the assembly elections | विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

यवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रापैकी केवळ पुसद आणि उमरखेड येथील आमदारांनी आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यात यश मिळाले. आजही या दिग्गज आमदारांच्या विरोधात प्रबळ असा दावेदार तयार झाला नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार, माणिकराव ठाकरे या दिग्गजांचा पराभव करण्यात विरोधकांना बर्‍याच दिवसांनी संधी मिळाली होती. विशेष म्हणजे विधानसभेपूर्वी झालेल्या २००४ च्या लोकसभा निवडणुकीत येथील काँग्रेसचे माजी खासदार उत्तमराव पाटील यांंना भाजपाने पराभूत केले होते. हीच लाट विधानसभेतही काही महिन्यातच दिसून आली. नेमकी तीच स्थिती आज निर्माण झाली आहे. आघाडीच्या सत्तेतील मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आमदार वामनराव कासावार, आमदार नंदिनी पारवेकर यांच्या विरोधात तयार होण्याची चिन्हे आहे. अनेक वर्षांपासून निवडून येत असलेल्या या आमदारांंचा पराभव शक्य असल्याचे विरोधकांच्या दृष्टीपथास आले आहे.

Web Title: The result of the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.