पारदर्शक निवडणुकांची जबाबदारी सर्वांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:22 IST2019-03-13T21:22:05+5:302019-03-13T21:22:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा ...

पारदर्शक निवडणुकांची जबाबदारी सर्वांचीच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.
नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे. अप्रिय घटना त्वरीत लक्षात आणून द्याव्यात आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नोडल आॅफीसर व विभाग प्रमुख यांच्याकडे सोपविलेल्या कामकाजाबाबत चर्चा केली. आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन होईल, कोठेही त्याचा भंग होणार नाही, याबाबत निर्देश दिले.
यावेळी कायदा व सुव्यवस्था, शस्त्र जप्ती, प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वाशिम व कारंजा येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे आणि अनुप खांडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.
सतत पेट्रोलिंगचे पोलिसांना निर्देश
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सतत पेट्रोलिंग चालू ठेवण्याचे निर्देश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी निवडणुकीच्या काळात दारुबंदी पथक योग्य दिशेने काम करेल व त्याकडे आपल्या विभागाचे विशेष लक्ष राहील, असे सांगितले. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी जास्त लक्ष केंद्रित करून काही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशा सूचना दिल्या.